मुरादाबाद : 'ईद मुबारक' म्हणत देशभर मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. या दिवशी एकमेकांची गळाभेट घेऊन मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा दिल्या. परंतु, मुरादाबादमध्ये एका तरुणीनं तरुणांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. हा व्हिडिओ त्या तरुणीच्याच एका मैत्रिणीनं शुट केल्याचंही व्हिडिओतून समजतंय. तरुणीची गळाभेट घेणाऱ्या मुलांची संख्याही ही मैत्रिण मोजत होती. एका मॉलच्या बाहेर उभं राहून हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचं दिसतंय. व्हिडिओमध्ये ५० पेक्षा जास्त लोकांनी तरुणीची गळाभेट घेतल्याचं दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे, व्हिडिओ संपला पण तरुणांची रांग मात्र संपली नव्हती. अर्थातच थोड्याच वेळात हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुरादाबादच्या 'वेव्ह सिनेमा' सिनेमाघराच्या बाहेर ही रांग लागली होती. तरुणीनं मोठ्या आनंदानं मुलांची गळाभेट घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तरुणीची गळाभेट घेण्यासाठी लहान मुलंही रांगेत उभी होती. व्हिडिओसोबतच तरुणांसोबत सेल्फीही घेतले गेले.


व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा


हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर त्यावर टीकाही झाली. सलमान अहमद एका युझरनं या व्हिडिओवर टीका करत म्हटलंय 'हा ईदचा सण आहे, युरोपीयन उत्सव नाही'... तर आणखी एक सईद सलीम नावाचा युझर म्हणतो, 'इस्लाममध्ये मुलीशी हात मिळवणंही चुकीचं आहे... अनाडी मुलीची गळाभेट घेत आहेत, अल्लाह माफ कर त्यांना'


ही तरुणी कोण आहे आणि तिनं गळाभेट घेत तरुणांना ईदच्या शुभेच्छा का दिल्या? यामागचं कारण मात्र अद्याप उघड झालेलं नाही...