Video : वरमाळा घालताच नवरी स्टेजवर कोसळली; आनंदाचा क्षण दु:खात बदलला
Heart Attack : अशी वेळ कुठल्याही आई-वडिलांवर येऊ नये, मुलीची पाठवणी करण्याऐवजी करावी लागली अंत्ययात्रेची तयारी. वरमाळा घातल्यानंतर नवरीने घेतला अखेरचा श्वास.
Dulhan Heart Attack Video : लग्न (marriage Video) म्हटलं की नवरदेव आणि नवरी (Groom Bride Video) संसाराची अनेक स्वप्न रंगवतात. आई - वडिलांसाठी मुलीचं लग्न हे एक स्वप्न असतं. मुलीचं लग्न थाट्यामाट्या करावं. जेव्हा मुलीच्या पाठवणींची वेळ येते आई - वडिलांसाठी हा क्षण कठीण असतो. एका डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात तर दुसऱ्या डोळ्यात मुलीच्या जाण्याने मन जड झालं असतं. एका लग्नातील हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ (Video viral) समोर आला आहे.
धक्कादायक व्हिडिओ! (Shocking video)
या व्हिडिओमध्ये लग्नाचा मस्त माहौल दिसतं आहे. नवरी आणि नवरदेव स्टेजवर एकमेकांना गळ्यात वरमाळा घालतं आहेत. नवरदेवाने कधी विचारही केला नसेल असा धक्कादायक क्षण त्याचा आयुष्यात आला.
हेसुद्धा वाचा - Video : ...अन् तिला रेस्टॉरंटच्या बाहेर उचलून फेकले
नवरीने नवरदेवाला वरमाळा घातली आणि ती स्टेजवर कोसळली. लग्नात अनेकांच्या हातात मोबाईल कॅमेरा असतात. ते सगळे आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करत असताना नवरीच्या अखेरचा क्षण (live heart attack video) टीपण्याची वेळ त्यांचावर आली होती.
नातेवाईकांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं. हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्यामुळे नवरीचा मृत्यू झाला होता. नवरीच्या आकस्मिक मृत्यूमुळे वराच्या कुटुंबियांसोबत नवरीच्या कुटुंबियांवर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे. (video bride fell on the stage during jaymala heart attack lucknow Shocking News viral on Social media)
खरं तर नवरीची तब्येत लग्नाच्या दिवशी खराब होती. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिचा रक्तदाब कमी असल्याचं सांगितलं. त्यानंतर काही वेळाने तिला बरं वाटलं म्हणून लग्नाचे कार्यक्रम सुरुच ठेवण्यात आले. कोणाच्या धानीमनी नसताना जेव्हा नवरी स्टेजवर कोसळली तेव्हा प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील लखनऊमधील भदवाना इथे घडली आहे.