Video : ...अन् तिला रेस्टॉरंटच्या बाहेर उचलून फेकले

Viral Video : सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये चार तरुणी एका तरुणीला उचलून रेस्टॉरंट बाहेर फेकताना दिसतं आहे.    

Updated: Dec 5, 2022, 01:12 PM IST
Video : ...अन् तिला रेस्टॉरंटच्या बाहेर उचलून फेकले title=
Video She was picked up and thrown outside the restaurant and Activists stage sit in protest at Salt Baes London restaurant on Social media nmp

Trending Video : आपण रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) आपले आवडीचे पदार्थांवर ताव मारायला जातो. चिकन (Chicken), मटन (Mutton), फिश (Fish) आणि कोळंबी फ्राय (Prawn Fry) वर म्हटलं की जीभेला पाणी सुटतं. सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ (girl Video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटच्या चार मुली कर्मचारी एका मुलीला बाहेर जमीनीवर फेकतात. या तरुणीने नक्कीच काही तरी हंगामा केल्या असेल किंवा रेस्टॉरंटचं हे असं कृत्य पाहून नेटकरी हैराण झाले आहे. 

नेमकं काय प्रकरण आहे? 

तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की, प्राणी प्रेमी लोक प्राण्यांना मारून खाण्याला विरोध करतात. त्यामुळे ते अनेक हॉटेल, रेस्टॉरंटबाहेर निदर्शन करताना दिसतात. लंडनमधील एका लोकप्रिय रेस्टॉरंटबाहेर प्राणी हक्क गट अॅनिमल रिबेलियनचे कार्यकर्ते निदर्शने करत असतात. यादरम्यान आंदोलकांनी रेस्टॉरंटमध्ये घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी एका तरुणीला बाहेर काढण्याचा हा व्हिडिओ आहे. 

 

हेसुद्धा वाच - China Space Station : अंतराळाचा चीन 'बादशहा'! 6 महिन्यांनंतर 3 अंतराळवीर अखेर पृथ्वीवर

 

प्राणी हक्क गटांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ट्वीटरवर Animal Rebellion या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

'अ‍ॅनिमल रिबेलियन' हा गट प्राणी हक्क आणि हवामानासाठी काम करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्राणी हक्क गटातील 8 कार्यकर्त्यांनी मध्य लंडनमधील नाइट्सब्रिजमधील नुसर-एट रेस्टॉरंटवर आपल्या मोर्चा नेला होता. मात्र त्यांची योजना त्यांचावरच उलटली.