Girl Dance Viral Video: हल्ली डान्स व्हिडीओज हे तुफान व्हायरल होताना दिसतात. कधी कोणी स्कुटरवर बाईक (Scooter Bike) चालवताना दिसतात तर कधी कोणी कारमध्ये (Car) पण आता एका मुलीनं चक्क आपल्या सायकलवरून चक्क (Girl Dance on Cycle Video) डान्स केला आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक मुलगी जांभळा लेहेंगा (Lavender Lehenga) घालून आणि आकर्षक ज्वलेरी घालून डान्स करताना दिसत आहे. सुरूवातीला ती सायकल चालवताना दिसते आहे. मग बलॅन्स झाल्यावर तिनं आपली नृत्यअदाकारी (Dance) दाखवायला सुरूवात केली. त्याचबरोबर मग तिनं आपल्या सायकलची स्पीडही वाढवली होती. त्याचबरोबर या नव्या डान्सचा फॉर्म पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रियाही तिला दिल्या आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिलात का? (video girl dances on cycle wearing lavender lehenga goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अशाप्रकारे डान्स करणं अनेकांना महागात पडू शकतं. त्यामुळे कुठेलही प्रशिक्षण घेतल्याशिवाय तुम्ही असा प्रयत्न करू नका. या मुलीनं व्हिडीओ करताना प्रशिक्षण घेतले असावे. हा व्हिडीओ करताना तिच्या आजूबाजूला कोणीच नव्हते. परंतु तिनं फार आत्मविश्वानं आणि धडाडीनं आपला डान्स केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तिनं मोठ्या प्रमाणात स्वत:चा बॅलन्स (Girl Dancing on Cycle) हा कायम ठेवला आहे. तिच्या चेहऱ्यावर हास्यही आहे. हा व्हिडीओ फक्त काही सेकंदाचा आहे. एकीकडे सायकल चालवणं त्यान सायकलवरचा बॅलन्स ठेवणं, त्यातून समोर कॅमेऱ्याकडे पाहत डान्स करणं काही सोप्पं नाही. 


तिच्या या ग्रेसफुल डान्ससाठी तिच्यावर सगळ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे. हल्ली लोकं सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी फार खतरनाक स्टंटबाजी करताना दिसतात. त्यात अनेकदा लोकांचा जीवही गेल्याचे दिसते. सोबतच सोशल मीडियावर (Social Media Viral Video) आजकाल सगळ्यांनाच चांगलं व्यासपीठ मिळालं आहे. जेणेकरून ते आपल्या डान्सचा, गाण्याचा परफॉर्मन्स दाखवू शकतात. अशावेळी त्यांनाही त्यांचे टेलेंट जगासमोर एका क्षणात दाखवता येते. 


हेही वाचा - Auto Expo 2023: सिंगल चार्जमध्ये 450 किलोमीटर धावणार ही कार... पाह भन्नाट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स


दिल हैं तुम्हारा... दिल लगा दिया... अशा गाण्यावर ही मुलगी नाचताना दिसते आहे. @iamsecretgirl023 या युझरवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तिच्या या व्हिडीओ अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक लोकांनी तिच्या या व्हिडीओवर सकात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर काहींना तिनं तर आपल्या प्रेमात पडायला लावले आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तिच्या या व्हिडीओला 40 हजाराहून जास्त लाईक्स आले आहेत. हा व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचतो आहे. सध्या या युझरनं आपले असे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल केले आहेत.