Auto Expo 2023: सिंगल चार्जमध्ये 450 किलोमीटर धावणार ही कार... पाह भन्नाट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

MG4 Electric Hechbak: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती कार्सची. अत्याधुनिक सुविधांसोबत सध्या अनेक नवनवीन कार्स येत आहेत. त्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) खूप मोठी क्रेझ आहे. या कार्सची किंमत फार असली तरी या गाडीतून तुम्हाला फार चांगले फिचर्स (Features) मिळतील.

Updated: Jan 12, 2023, 04:06 PM IST
Auto Expo 2023: सिंगल चार्जमध्ये 450 किलोमीटर धावणार ही कार...  पाह भन्नाट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स title=
file

MG4 Electric Hechbak: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती कार्सची. अत्याधुनिक सुविधांसोबत सध्या अनेक नवनवीन कार्स येत आहेत. त्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) खूप मोठी क्रेझ आहे. या कार्सची किंमत फार असली तरी या गाडीतून तुम्हाला फार चांगले फिचर्स (Features) मिळतील. तेव्हा जाणून घेऊया की या नव्या आलेल्या कारमध्ये नक्की कोणकोणते फिचर्स आहेत. ही गाडी मॉड्यूलर स्केलेबल प्लॅटफॉर्ममधून (Modular Scaleable Platform) तयार केली आहे. जे या गाडीच्या खालच्या भागाला असते. या गाडीचे नावं एमजी फॉर इलेक्ट्रीक हॅचबॅक (MG4 Electric Hechback) आहे. (Auto Expo 2023: MG4 Electric Hatchback Unveiled In India With Range Of 450Km Auto News Marathi)

ही गाडी ऑटो एक्स्पो 2023 (Auto Expo 2023) मधून समोर आली आहे. एमजी मॉटर इंडियाकडून ही गाडी पेश करण्यात आली आहे. या गाडीची विक्री युरोप देशात सुरू झाली आहे. या गाडीची क्रॅश टेस्टही झाली आहे. या गाडीची क्रॅश टेस्टही झाली आहे. या गाडीत ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेकिंग आणि वार्निंग सिस्टीम (Warning system) आहे. या गाडीत डुअल टोन रूफ आहे. म्हणजे तुमच्या गाडीच्या वरच्या भागाचा रंग वेळ असतो.

काय आहेत या गाडीचे फीचर्स? 

ही गाडी तुम्हाला चांगल्या मोठ्या लांबीची मिळेल म्हणजे या गाडीत तुम्हाला तुमच्या नातेवाईकांनाही आनंदानं लॉन्ग ड्राईव्हला (Long Drive) घेऊ जाता येईल. या कारचे रंगही खूप उत्कंठावर्धक आहेत. या गाडीची लांबी 4287 mm आणि रूंदी 1836 mm तर उंची 1504 mm आणि व्हीलबेस 2705 mm एवढी आहे. तुम्ही या गाडीतील रियर सीट्स दुमडूही (Rear Seats) शकता. या गाडीची चांगली टेस्टींग झाली आहे. सेफ्टी मॅनेजरनं या गाडीला 5 स्टार रेटिंग्स दिले आहेत. या गाडीत 360 डिग्री कॅमरा आहे. या गाडीत सात लोकं आरामात बसू शकतात.   

हेही वाचा - Elections: इथं अर्धनग्न अवस्थेतच उमेदवार का दाखल करतायत अर्ज?

या गाडीचे हे आकर्षक रंग पाहून तुम्हालाही ही कार घ्यावीशी वाटते. त्याचसोबत या गाडीतले आकर्षक डिझानेन स्ट्रेचर (Design Strecher) पाहूनही तुम्हीही या गाडीच्या प्रेमात पडाल. या गाडीच्या पुढल्या बाजूला या गाडीवर चांगले लाईट्सही मिळतील. त्यामुळे ही गाडी नोकरदार वर्गांसाठी (Working Class) आकर्षक आहे. या गाडीतले चार्चिंग 35 मिनिटांत चार्ज होते त्यात ही बॅटरी 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कुठेही जायचे असल्यास तुम्ही या गाडीतून आरामात जाऊ शकता. या गाडीला AC आणि DC असं चार्जिंग आहे. 

ही गाडी 14 लाख, 20 लाख ते 40 लाखांपर्यंत तुम्हाला मिळू शकते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x