Girl Stuck Between Platform and Train : बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Video) समोर आला होता. ज्यामध्ये एक विद्यार्थी प्लॅटफॉर्म (Platform) आणि ट्रेनच्यामध्ये (Train) अडकली. हे दृश्यं पाहतनाच अंगावर काटा येतो. तब्बल दीड तासांच्या अथक संघर्षानंतर त्या सुटकेचा श्वास घेतला खरा, मात्र उपचारादरम्यान जीवन जगण्याची तिची धडपड अपयशी ठरली. या मुलीने उपचारादरम्यान गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. 


संघर्ष अपयशी ठरला!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेन आणि प्लॅटफॉर्म दरम्यान अडकलेल्या मुलीला दुर्घटनेत मूत्राशयाला दुखापत झाली होती. तिला खूप रक्तस्त्राव होतं होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होता पण अथक प्रयत्नानंतरही तिचा मृत्यू झाला. शशिकला (Sasikala) असं या मुलीचं नाव होतं आणि ती 20 वर्षांची होती. (Video girl who was stuck between the train and the platform passed away during treatment andhra student)



काय घडलं होतं?


ती कॉलेजला जाण्यासाठी अण्णावरहून दुव्वाडाला गेली. मात्र गुंटूर-रायगडा एक्सप्रेसमधून पाय घसरला आणि शशिकला रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्यामधल्या भागामध्ये अडकली. या दुर्घटनेत अडचण अशी झाली होती की तिला हालचालही करायला जरादेखील जागा नव्हती. परिणामी शेवटी प्लॅटफॉर्मचा काही भाग कट करावा लागला. जवळपास दीड तासांनी तिची सुटका करण्यात आली.