प्रताप नाईक, झी २४ तास, गोवा : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा देशविदेशातील पर्यटकांनी फुलून गेलं आहे. आतापर्यत ४५० हून अधिक परदेशी पाहुणे चार्टड विमानानं गोव्यात दाखल झाले आहेत. ही संख्या गेल्या काही वर्षाच्या तुलनेनं कमी असली तरी गोव्यातला उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ डिसेंबरची पार्टी आणि नववर्ष स्वागतासाठी गोवा पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेलं आहे. गोव्यातली सर्वच हॉटेलं फुल झाली असून पर्यटक ख्रिसमसआधीच गोव्यात दाखल झाले आहेत. 


निसर्गाचं वरदान लाभलेली किनारपट्टी, स्वच्छंदी वातावरण, मौजमजा आणि धमालमस्ती, ही गोव्याची ओळख बनली आहे. त्यामुळेच देशासह विदेशातल्या पर्यटकांनाही गोवा नेहमीच भूरळ घालतो. 


नववर्ष स्वागतासाठी गोव्यातील पालोलेम, बागा, अंजुना, कलंगुट आणि मीरामार यासारख्या २७ मोठ्या बीचवर जोरदार पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर गोव्यातील हॉटेलं, पब आणि कॅसीनोवरही भरगच्च कार्यक्रमांची रेललेच असणार आहे.