Drunk Man Viral Video:  जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2023) साजरा केला जात आहे. अशातच ओडिसामधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू येईल आणि भिती देखील वाटेल. कारण, या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर असलेल्या साईनबोर्डवर चढून पुश मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


असं कुणी करता का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहसा लोक व्यायामशाळेत, उद्यानात किंवा मैदानात व्यायाम करताना दिसतात. मात्र, या व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध अत्यंत उंचीवर लावण्यात आलेल्या साइन बोर्डवर चढून एक तरुण पुशअप करताना दिसत आहे. रस्त्यावर लावण्यात आलेल्या साईन बोर्डवर चढून पुशअप मारणाऱ्या या तरुणाला पाहून सगळेच अंचंबित झाले आहेत. रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या नागरिकांनी या तरुणाचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. 


सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल


 


@Sambalpuri Mahani नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.  59,397 लोकांनी हा व्हिडिओ like केला आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक जण कमेंट् करत या व्यक्तीची खिल्ली उडवत आहेत. कोणती नशा करुन एवढ्या उंचीवर चढला? हवेत पुशअप मारणारा हा एकटाच असावा अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. हा व्हिडिओ  ओडिशातील बोलंगीर जिल्ह्यातील आहे. 


 


साईन बोर्डवर चढणारा  तरुण मद्यधुंद


साईन बोर्डवर चढणारा हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. दारुच्या नशेत हा तरुण साईनबोर्डवर चढला आणि त्याने पुशअप मारायला सुरुवात केली. 30 सेकंदाच्या या व्हिडिओत तरुण पुशअप मारताना दिसत आहे. रस्त्यावरुन ये जा करणारे वाहन चालक थांबून या तरुणाचे कृत्य पाहत आहेत. अनेकांनी यांचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आहे. 
 हरियाणातील गुरुग्राम (Gurugram News) येथील एका तरुणाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत  एक तरुण धावत्या कारच्या छतावर पुशअप मारताना दिसत होता.