व्हिडिओ : जेव्हा शाळेत बारबालांवर उडवले जातात पैसे...
शिक्षेचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या शाळेतच बार गर्ल्स थिरकताना दिसल्या तर...
नवी दिल्ली : शिक्षेचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या शाळेतच बार गर्ल्स थिरकताना दिसल्या तर...
हा प्रकार उघडकीस आलाय उत्तरप्रदेशातील एका सरकारी शाळेत... या व्हिडिओत शाळेतील वर्गांत डान्सर नाचताना दिसत आहेत... आणि उपस्थित लोग तिच्यावर पैसे उडवत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.
हा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील आहे. रक्षाबंधनच्या दिवशी शाळेतला वर्ग 'डान्सबार' बनला होता. वर्गात बनवण्यात आलेल्या स्टेजवर डान्सरनं जोरात ठुमके लगावले...
या व्हिडिओ नंतर शिक्षण विभागावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी अशा कार्यक्रमासाठी परवानगी दिली होती का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.
चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेतरिया गावात पाच ऑगस्ट रोजी गावाच्या प्रमुखानं आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्तानं या अश्लिल कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सरकारी शाळांत खाजगी कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही. तसंच शाळांमध्ये असे अश्लिल कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकत नाहीत. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय.