चेन्नई : भारतीय वायू सेनेने आपली ताकत दाखवत, हवेत लढाऊ विमान असताना इंधन भरण्याचं प्रदर्शन करून दाखवलं. या दरम्यान एक विमान हवेत उडत असताना, इतर विमानाच्या माध्यमातून त्यात इंधन टाकलं जात होतं. वायू सेनेसाठी ही एक शानदार बाब आहे, कारण यामुळे विमानाला जास्तवेळ हवेत उडवलं जाऊ शकतं. युद्धस्थितीत हवेत इंधन भरण्याची प्रक्रिया पूर्ण होवू शकते. या आधी विमानात इंधन भरण्यासाठी त्याला जमीनीवर उतरावं लागत होतं.



भारत आणि रशियाच्या कंपन्यांमध्ये ७ करार 


संरक्षण प्रदर्शनात भारत आणि रशिया या कंपन्यांमध्ये ७ करार झाले, तर दुसरीकडे भारत आणि रशिया यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या संरक्षण प्रदर्शनात, १३ एप्रिलला ७ करारांवर हस्ताक्षर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. भारतीय नेव्हीने समुद्रात काम करणारं यंत्र बनवण्यासाठी रशियाच्या रोसोबोरोनएक्सपोर्ट सोबत करार केला होता.