Manipur Violence Viral Video: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना समोर आल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. मणिपूरमधील घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट असतानाच हा व्हिडीओ समोर आल्याने धक्का बसला आहे. व्हिडीओत कुकी (Kuki) समाजातील एका व्यक्तीचं शीर कापून ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कुकी समाजातील डेव्हिड थिक यांचं कापलेलं शीर बिष्णुपूर जिल्ह्यातील एका निवासी भागात बांबूपासून तयार करण्यात आलेल्या कुंपणावर ठेवण्यात आलं होतं. डेव्हिड छीक यांची 2 जुलै झालेल्या हाणामारीत हत्या झाल्याचा संशय आहे. रात्री 12 वाजता ही हाणामारी झाली होती. यावेळी तीन लोकांचा मृत्यू झाला होता. 


मणिपूर Video प्रकरण: 'आमच्या समाजाला डाग लावला', म्हणत गावातील महिलांनीच जाळलं आरोपीचं घर


 


मणिपूरमध्ये 4 मे रोजी दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. जमाव महिलांना पकडून नेत असतानाचा हा व्हिडीओ दोन महिन्यांनी समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दोषींना सोडलं जाणार नाही असं जाहीर केलं आहे. दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. 


मणिपूरनंतर आणखी एक संतापजनक घटना! बंगालमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन फिरवलं, गावात काढली धिंड


 


जमावाने यावेळी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तसंच मध्यस्थी करणाऱ्या तिच्या भावाची हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच राजकीय नेते यावर व्यक्त होत आहेत. सुप्रीम कोर्टानेही या घटनेची दखल घेतली आहे. 


आरोपींचं घर जाळलं


या घटनेनंतर संताप असून मणिपूरमधील महिलांनी येथील कुकी समाजातील महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीच्या घराला आग लावली आहे. आरोपीच्या घरावर मोठ्या संख्येनं जमावाने हल्ला केला. नंतर त्यांनी घराला आग लावली. आरोपीच्या घराला आग लावल्याच्या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


चार आरोपी अटकेत


धिंड काढल्या प्रकरणी आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बुधवारी हुइरेम हेरोदास मेइतेई नावाच्या इसमाला अटक केली. महिलांची धिंड काढणाऱ्या गर्दीमधील हुइरेम हा आघाडीवर होता. पेची अवांग लीकाई येथे राहणारा 32 वर्षीय हुइरेम पीडित महिलेच्या छातीवर दोन्ही हात ठेऊन तिला शेतात घेऊन जाताना दिसत आहे. हुइरेमला अटक करण्यात आल्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेनं आरोपीचे 2 फोटो शेअर केलेत. पहिल्या फोटोत हा आरोपी व्हिडीओमधील स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत त्याला पोलिसांनी अटक केल्याचं दिसत आहे. या प्रकरणामध्ये एकूण 4 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.