Video : ओ चाचा..! Delhi Metro मध्ये चाचाने केला राडा, सर्वांसमोर फुकली बिडी अन्...
Delhi Metro Viral Video : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दिल्ली मेट्रो अधिकार्यांकडून उत्तर मागितलं आहे.
Smoking In Delhi Metro : एखाद्या गोष्टीचं व्यसन माणसाला कोणत्या थराला जाऊ शकतं, हे सांगू शकत नाही. दिल्ली मेट्रो (Delhi Metro) गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. त्याला कारण म्हणजे व्हायरल (Viral Video) होणारे व्हिडीओ. अशातच दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एक चाचाने चालत्या मेट्रोमध्ये सर्वांना अडचणीत टाकलं. नेमकं काय झालं? प्रवाशांची भंबेरी का उडाली? पाहुया...
तर झालं असं की, एक वृद्ध व्यक्ती दिल्ली मेट्रोमध्ये चढला. त्यावेळी त्याला बसायला जागा मिळाली. त्यानंतर चाचाने थेट बिडी काढली अन् माचिसच्या सहाय्याने पेटवली. बिडी पेटत नव्हती, तरी देखील त्याने बिडी अखेर (Man Smoking Bidi In Delhi Metro) पेटवली अन् माचिसची काढी झटकत मेट्रोमध्येच फेकली. त्याचवेळी मेट्रोमधील अनेक लोक चाचाकडे बघत राहिले. माचिसची काडी पेटली राहिल्याने प्रवाशांच्या मनातील धाकधूक वाढतच होती. शेवटी एका व्यक्तीने मासिचची काढी जळत असल्याचं चाचाला सांगितलं.
पाहा VIDEO
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दिल्ली मेट्रो अधिकार्यांकडून उत्तर मागितलं आहे. मात्र, डीएमआरसी (DMRC) आणि इतर अधिकार्यांनी अद्याप उत्तर दिलं नाही. अशा घटनेमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने अशा व्यक्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर आता डीएमआरसी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये कपल सर्वांसमोर किसिंग (Delhi metro couple kissing video) करताना दिसत आहेत. मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक कपल एकमेकांच्या अगदी जवळ मिठीत असताना दिसून येतंय. ते फक्त एकमेकांना मिठी मारत नाही तर ते सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसून येत आहे. त्यामुळे मेट्रोमधील प्रवाशी लाजल्यात जमा झाले. हा व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होत असून लोकांनी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.