Minister Fell Down From A Vehicle During Election Rally: तेलंगणमधील मंत्री आणि बीआरएसचे नेते के. टी. राव यांचा एक विचित्र अपघात झाला आहे. एका निवडणूक प्रचार रॅलीमध्ये चालकाने कचकचून ब्रेक दाबल्याने मंत्री मोहोदय प्रचारासाठी आणलेल्या गाडीच्या टपावरुन थेट खाली कोसळले आहेत. निझामाबाद जिल्ह्यातील अरमूर येथे हा विचित्र प्रकार घडला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गाडीच्या टपावर उभं राहून हे नेते मंडळी मतदारांना हात उंचावून अभिवादन करत असतानाच गाडी अचानक थांबते. चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने टपावर उभे असलेले नेते संतुलन गेल्याने खाली पडतात. 


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

के. टी. राव यांच्याबरोबरच निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्याबरोबर फिरत असलेले जिवन रेड्डी आणि सुरेश रेड्डीही गाडीवरुन थेट खाली जमीनीवर पडले. या सर्व नेत्यांना सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही. या सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या अपघाचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केला आहे. अपघातानंतर सावरलेल्या या तिन्ही नेत्यांनी पुन्हा आपला रोड शो सुरुच ठेवला. के. टी. राव हे जीव रेड्डीच्या समर्थनार्थ प्रचारात सहभागी झाले होते.



सर्वांचं या मतदारसंघाकडे लागलं लक्ष


केटीआर यांनी पूर्वी सिरकीला मतदारसंघामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा मतदारसंघ बीआरएसचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होण्याची दाट शक्यता आहे. यात केटीआर, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कडवी झुंज होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या मतदारसंघामध्ये कोडम कोरुना महेंद्रा रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने मल्लूकारी नसरा गौड यांना उमेदवारी दिली आहे. तेलंगणमध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सिरकीला मतदारसंघ हा राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. 2 राष्ट्रीय पक्षांपैकी एकाला विजय मिळणार की राज्यस्तरीय पक्ष सरस ठरणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागलेलं आहे.


119 सदस्यांची निवड


3 डिसेंबर रोजी तेलंगण विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. 9 ऑक्टोबर 2023 रोजी, भारतीय निवडणूक आयोगाने 2023 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी केली. 5 डिसेंबर 2023 रोजी राज्याच्या विधानसभेच्या सर्व 119 सदस्यांची निवड करण्यासाठी समाप्त होईल.