COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Video on Tirumala laddu : देशातील प्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी तिरुमला तिरुपती बाजाली मंदिराचं (Tirumala Tirupati Bajali Temple) नाव घेतलं जातं. या मंदिरात जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येतं असतात. या मंदिरातील प्रसिद्ध प्रसाद लाडू सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. एका भाविकांने लाडूच्या वजनासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर (video viral on social media) केला. त्यानंतर TTD पासून भाविकांमध्ये खळबळ माजली आहे. 


लाडूच्या वजन मापात पाप करुन नका!


गुरुवारी सोशल मीडियावर एका भक्ताने प्रसाद लाडू वजनासंदर्भात व्हिडीओ शेअर केला. प्रसादाचा लाडू हा 160 ते 180 ग्रॅम असतो. या व्हिडीओमध्ये भक्त प्रसाद काउंटरवरील कर्मचाऱ्याला लाडूचं वजन करण्यास सांगतो. जेव्हा तो वजनकाटावर लाडू ठेवतो तर काय, लाडूचं वजन 90 ते 100 ग्रॅम भरतं. वारंवार वजन करुनही लाडूचं वजन तेवढंच असतं. त्यानंतर भक्त आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतो. यावेळी प्रसादम वितरण, सरकार आणि टीटीडी बोर्डाकडून भक्तांची फसवूक होत असल्याचा आरोप भक्ताने केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. टीटीडी आणि राज्य सरकारवर अनेक स्तरांतून तीव्र टीका करण्यात येतं आहे. (video tirupati tirumala laddu weight viral on social media nmp)


हे ही वाचा -  Tirupati Temple net worth : हे भगवान! तिरुमला तिरुपती ट्रस्टकडे इतकं टन सोनं, रोकड अन् मालमत्ता...


टीटीडीकडून स्पष्टीकरण


या प्रकरणानंतर तिरुमला लाडूचे वजन कधीही 160 ग्रॅमपेक्षा कमी नसतं असं स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ट्रस्टकडून लाडूचा दर्जा, गुणवत्ता आणि वजनात कुठलेही तडजोड करत नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन मंदिर ट्रस्टकडून करण्यात आले आहे. 




मंदिरातील Srivari Potu म्हणजे मंदिरातील स्वयंपाकघरात कशाप्रकारे लाडू तयार करण्यात येतात त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लोक मोठ्या प्रमाणात पाहत आहेत.