Tirupati Temple net worth : हे भगवान! तिरुमला तिरुपती ट्रस्टकडे इतकं टन सोनं, रोकड अन् मालमत्ता...

Tirupati Balaji Asset Details : देवस्थानमने आपली संपत्ती जाहीर केल्यावर सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. ट्रस्टकडे किती टन सोनं (gold), रोकड (cash) अन् मालमत्ता (property) आहे हे ऐकून तुम्ही चक्रावून जालं.

Updated: Nov 7, 2022, 08:58 AM IST
Tirupati Temple net worth : हे भगवान! तिरुमला तिरुपती ट्रस्टकडे इतकं टन सोनं, रोकड अन् मालमत्ता... title=
Tirupati Temple net worth declaired richest temple nmp

Tirumala Tirupati : देशातील सर्वात प्रसिद्ध तिरुमाला तिरुपती देवस्थानमला (TTD) जगभरातून दररोज लाखो भाविक दर्शनाला येतात. या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने भरभरून दान करतात. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरात या मंदिराचा समावेश आहे. त्यात देवस्थानमने आपली संपत्ती जाहीर केल्यावर सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. ट्रस्टकडे किती टन सोनं (gold), रोकड (cash) अन् मालमत्ता (property) आहे हे ऐकून तुम्ही चक्रावून जालं. (Tirupati Temple net worth declaired richest temple nmp)

हे भगवान! एवढी संपत्ती 

ट्रस्टकडून संपत्तीची माहिती जाहीर झाल्यानंतर देवाची श्रीमंती खऱ्या अर्थाने सिद्ध होते. ट्रस्टच्या नावावर 2.5 लाख कोटींहून अधिक संपत्ती आहे. तर 10.25 टन सोनं, 2.5 टन सोन्याचे दागिने आणि 16,000 कोटी रुपयांसह सर्व बँकांमध्ये जमा आहे. याशिवाय ट्रस्टकडे संपूर्ण भारतात 960 मालमत्ता आहे. ट्रस्टकडे किती मालमत्ता आहे याबद्दल पहिल्यांदाच खुलासा करण्यात आला आहे. 

बँकेतील व्याजामुळे संपत्ती वाढ (bank interest)

मिळालेल्या माहितीनुसार बँकांकडून मिळणाऱ्या व्याजामुळेही ही वाढ नोंदवली जात असल्याचं बोलं जातं आहे. ट्रस्टने सांगितले की 2022-23 मध्ये 3,100 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, त्यापैकी 668 कोटी रुपये फक्त बँकांच्या व्याजासाठी होते. 

'या' कंपन्यांनाही टाकलं मागे

शेअर बाजाराच्या (stock market) आकडेवारीनुसार, तिरुपती मंदिराची मालमत्ता भारतातील अनेक मोठ्या उद्योगांपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला तोपर्यंत विप्रोचे बाजारमूल्य 2.14 लाख कोटी रुपये होते. त्याच वेळी, अल्ट्राटेक सिमेंटचे बाजार मूल्य 1.99 लाख कोटी इतके नोंदवले गेले. याशिवाय बहुराष्ट्रीय कंपनी नेस्लेच्या भारतीय युनिटचे मूल्य शुक्रवारी 1.96 लाख कोटी होते. दरम्यान मंदिर ट्रस्टच्या मालमत्तेपेक्षा केवळ दोन डझन कंपन्यांचं मूल्यांकन जास्त आहे. या कंपन्यांमध्ये रिलायन्स (Reliance) आणि टाटा सन्सचा (Tata Sons) समावेश आहे.