Video Truck Driver Vs Man Sitting In Middle Of Road: उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे एक विचित्र घटना घडली आहे. मद्यधुंदावस्थेत एक व्यक्ती चक्क रहदारी सुरु असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी खुर्ची टाकून बसला. विशेष म्हणजे ही घटना पोलीस स्टेशनसमोर घडली. या व्यक्तीने मद्यप्राशन केल्याचं सांगितलं जात आहे. तर काही दाव्यांनुसार ही व्यक्तीने नेमकी अशी रस्त्याच्या मध्यभागी बसण्याचं कारण काय आहे याबद्दलचा संभ्रम कायम असून ही व्यक्ती पोलिसांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी अशी रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून बसली की त्यामागे अन्य काही कारण आहे हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र या व्यक्तीबरोबर नंतर जे काही झालं ते फारच धक्कादायक आहे.


सोशल मीडियावर व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगाने कार आणि अवजड वाहनं जात असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी ही व्यक्ती प्लॉस्टिकच्या खुर्चीवर ठाण मांडून बसली. या व्यक्तीच्या आजूबाजूने बऱ्याच गाड्या गेल्या. या व्यक्तीचा व्हिडीओ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अन्य एका व्यक्तीने शूट केल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्रकार रणविजय सिंह यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. "पोलीस चौकीसमोर, रस्त्याच्या मधोमध बसला होता," अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे.


नक्की पाहा >> ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून..


ट्रकने धडक दिली पण...


सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आधी बऱ्याच गाड्या या व्यक्तीच्या आजूबाजूने निघून जातात. मात्र एक ट्रकवाला या व्यक्तीला धडा शिकवण्याच्या उद्देशाने असं काही करतो की पाहणाऱ्यांच्या काळजाचाही ठोका चुकतो. हा ट्रक या व्यक्तीच्या खुर्चीला बाजूने धडक देऊन पुढे निघून जातो. ही धडक अशा पद्धतीने देतो की या व्यक्तीला फारशी काही इजा होतं नाही. मात्र त्याची खुर्ची तुटून तो खाली रस्त्यावर पडतो. हा ट्रकवाला आपली स्पीड कमी करतो तेव्हा या व्यक्तीची नौटंकी पाहणारे रस्त्याच्या बाजूला उभे असलेले प्रत्यक्षदर्शी त्या ट्रकवाल्याला चिंता न करता निघून जाण्यास सांगत असल्याचं व्हि़डीओमध्ये दिसतं.



धडक दिल्यानंतरही बराच वेळ बसून होता त्याच ठिकाणी


ट्रकने धडक दिल्यानंतर खुर्ची तुटून पडल्यावरही ही व्यक्ती बराच वेळ रस्त्याच्या मध्यभागी बसून होती. रात्रीच्या अंधारात आपल्याला एखादं वाहन धडक देईल किंवा आपण या वाहनाखाली चिरडे जाऊ याची भिती या व्यक्तीला वाटत नव्हती. या व्यक्तीच्या सदर कृतीमधील कारण काय आहे याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र या व्यक्तीविरोधात कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नसल्याचं स्पष्ट होत आहे.