जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणुकीतील विजय हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेली भेट आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केले. राहुल गांधी यांनी बरोबर एक वर्षापूर्वी ११ डिसेंबरलाच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर आता काँग्रेस राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये सत्तास्थापन करण्याच्या मार्गावर आहे. राजस्थानमध्ये तर काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल. या तिन्ही राज्यांतील निकाल गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेहनतीचे फळ असल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी ११ डिसेंबरला सोनिया गांधी यांच्याकडून राहुल यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या देहबोलीत कमालीचा आत्मविश्वास दिसू लागला होता. गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्याची चुणूक दिसून आली होती. मात्र, राहुल गांधी यांना कोणत्याही निवडणुकीत पक्षाला निर्णयाक यश मिळवून देता आले नव्हते. परंतु, यंदा राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसला मिळालेले यश हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारे ठरू शकते. 


LIVE Assembly Elections Result 2018 : मध्य प्रदेशच्या निकालाची देशाला उत्सुकता


याशिवाय, या निकालांमुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर हे निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणार आहेत. तर दुसरीकडे या निकालांमुळे भाजपला आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. 


निकालांनंतर मोदींचा सूर नरमला; अधिवेशनात विरोधकांना सहकार्याचे आवाहन