Vijay Diwas : 1971 च्या बांग्लादेश मुक्ती युद्धात भारताचा पाकिस्तानवर विजय
Vijay Diwas : 16 डिसेंबर या दिवशी भारताने पाकिस्तानवर बांग्लादेश मुक्ती युद्धात विजय मिळवला. सैन्यातील दिग्गज लोक, सशस्त्र सेना, राजकारणी आणि सरकार या योद्धांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली वाहतात.
Vijay Diwas 16 December 2022 : 1971 च्या बांग्लादेश मुक्ती युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण आज 'विजय दिवस' (Vijay Diwas) साजरा करुन देश करत आहे. या दिवशी, लष्करी वीरांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. पाकच्या पराभवानंतर, जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याने 16 डिसेंबर 1971 रोजी ढाका येथे लेफ्टनंट जनरल जगजित सिंह अरोरा यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या सैन्याला बिनशर्त आत्मसमर्पण केले.
भारताच्या मदतीने मोठा संघर्ष केल्यावर बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळाले. 1971 च्या युद्धाने अमेरिका आणि भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या दक्षिण आशियाई देशांमधील संबंध बदलले. विजय दिवस 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या विजयाचे स्मरण केले जाते. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या शहीदांचे स्मरण केले जाते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 13 दिवसांचा संघर्ष 16 डिसेंबर 1971 रोजी संपला. परिणामी बांग्लादेश या नवीन देशाची निर्मिती झाली. बांग्लादेशमध्ये हा दिवस बिजॉय दिबोस (Bijoy Dibos) किंवा विजय दिवस म्हणूनही ओळखला जातो.
पंतप्रधान मोदी विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला, आर्मी हाऊसमध्ये 'अॅट होम' रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते. 1971 च्या युद्धात विजय मिळवून देणार्या आमच्या सशस्त्र दलांचे शौर्य भारत कधीही विसरणार नाही, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला आर्मी हाऊसमधील अॅट होम रिसेप्शनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे उपस्थित होते.
राजनाथ सिंह म्हणाले, 'आज विजय दिवसानिमित्त, भारताच्या सशस्त्र दलांच्या अनुकरणीय धैर्य, शौर्य आणि बलिदानाला राष्ट्र सलाम करतो. 1971 चे युद्ध हे मानवतेचा अमानवतेवर, गैरवर्तनावर सद्गुण आणि अन्यायावर न्यायाचा विजय होता. भारताला त्याचा अभिमान आहे.
सैन्यातील दिग्गज लोक, सशस्त्र सेना, राजकारणी आणि सरकार या योद्धांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली वाहतात. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी लष्कराने आत्मसमर्पण केले आणि 13 दिवस चाललेला संघर्ष संपुष्टात आला. पाकिस्तानपासून बांग्लादेशच्या स्वातंत्र्याचा विजय दिवसही साजरा केला जातो.