विजय माल्ल्यास आणखी एक झटका, लंडनच्या बॅंकेने अर्ज फेटाळला
मनी लॉंड्रींग प्रकरणातील दोषी व्यावसायिक विजय माल्ल्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
लंडन : आर्थिक घोटाळा आणि साधारण नऊ हजार कोटींच्या मनी लॉंड्रींग प्रकरणातील दोषी व्यावसायिक विजय माल्ल्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यात त्याला आता जेट एअरवेजची काळजीही वाटू लागली आहे. जेट एअरवेजला कोणतीही मदत न मिळाल्याने माल्ल्याने ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. मी बॅंकांचे पूर्ण कर्ज फेडेन असे त्याने म्हटले आहे. दरम्यान दिवस संपता संपता माल्ल्याला ब्रिटनच्या न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. लंडन येथील बॅंक खात्यात असलेली जमा रक्कम मिळावी असा अर्ज माल्ल्याने केला होता. पण तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. भारतीय एजंसीचे हे मोठे यश मानले जात आहे.
भारतीय बॅंकाच्या ग्रुपमध्ये 2 लाख 60 हजार पाऊंड च्या रक्कम वसूलीत अडथळा आणण्याचा माल्ल्याचा आणखी एक प्रयत्न फसला आहे. माल्ल्या अनेक कायदेशीर कारवाईत अडकला आहे. आता भारतीय बॅंक माल्ल्ल्याच्या आयसीआयसीआय यूकेतीस बॅंकेवर नजर ठेवू शकणार आहे.
कर्जाचा डोंगर
11 सप्टेंबर 2018 ला 13 भारतीय बॅंकाकडून विजय माल्ल्या विरोधात याचिका दाखल झाल्या. ज्यावर सुनावणी सुरु आहे. मुले आणि पार्टनर ललवानी माझा संभाळ करत असल्याचे माल्ल्याने ब्रिटनच्या कोर्टात सांगितले. माल्ल्याने स्वत:चा गुजराणा करण्यासाठी व्यावसायिक बेदीकडून 75.7 लाख आणि आपली खासगी सहाय्यक महलकडून 1.15 कोटी रुपये उधार घेतले आहेत. कर्ज चुकवणे आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने हे कर्ज घेतले आहे.
जेट एअरवेजचा पुळका
विजय माल्ल्या याने ट्विट करत आपले पैसे वापरून जेट एअरवेजला वाचवण्याची मागणी भारतीय बँकांकडे केली आहे. कर्नाटक हायकोर्टापुढे पीएसयू बँक आणि अन्य कर्जदारांचे पैसे परत देण्याचा प्रस्ताव मी यापूर्वीच ठेवला आहे, असे म्हणत आपले पैसे बँक का घेत नाही? असा प्रश्न त्याने उपस्थित केला. एनडीए सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका विजय माल्ल्याने केली. सोबतच हेच धोरण किंगफिशर एअरलाईन्स एअरलाईन्स असताना का अवलंबलं गेलं नाही असा सवालही त्याने उपस्थित केला. मी देऊ केलेले ९००० कोटी परत घ्या, जेटला वाचवायला उपयोगी पडतील असा टोलाही मल्ल्याने लगावला.