chandrayaan 3 pragyan rover and vikram lander : भाराताची चांद्रयान 3 मोहिम नवी भरारी घेण्यासाठी काही काळ विश्रांती घेणार आहे. प्रज्ञान रोव्हरनंतर विक्रम लँडरही स्लीप मोडमध्ये गेला आहे.  ऐतिहासिक उडीनंतर विक्रम विश्रांती घेणार आहे. चांद्रयान 3 मोहिमेतील पुढचे अपडेटस  22 सप्टेंबरला मिळणार आहेत. 


चंद्रावर संशोधन करणा-या प्रग्यान रोव्हरचं पहिल्या टप्प्यातलं संशोधन पूर्ण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रावर संशोधन करणा-या प्रग्यान रोव्हरचं पहिल्या टप्प्यातलं संशोधन पूर्ण झालंय. प्रग्यान रोव्हर आता स्लीपमोडवर आहे. चंद्रावर सूर्यास्त झाल्यामुळे प्रग्यान स्लीपमोडवर गेला आहे. आता 22 सप्टेंबरला सूर्योदय होईल त्यानंतर तो पुन्हा कार्यरत होणार आहे.   प्रग्यान रोव्हरवर दोन पेलोड आहेत.  लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप अर्थात LIBS आणि  अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर म्हणजेच APXS.  एक्स रे मशीनमुळे चंद्रावर सल्फर सापडल्याचं समजलंय. रोव्हरवर असलेल्या स्पेट्रोस्कोपनं चंद्रावर सल्फर असण्याला पुष्टी दिलीय. आता चंद्रावर हे सल्फर कुठून अस्तित्वात आलं. ज्वालामुखीमुळे, उल्कापातामुळे किंवा आणखी कुठल्या कारणामुळे चंद्रावर सल्फर आढळलं, याचा अभ्यास, शास्त्रज्ञ करणार आहेत. चंद्रावर ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे देखील सापडली आहेत. 


हॉप एक्सपेरीमेंटनंतर विक्रम लँडर स्लीप मोडमध्ये


इस्रोने चंद्रावर पाठवलेल्या यानाने आणखी एक प्रयोग यशस्वी केलाय. नुकताच विक्रम लँडरने हॉप एक्सपेरीमेंट म्हणजे उडी मारण्याचा प्रयोग यशस्वी केला. कमांड मिळाल्यानंतर विक्रम लँडरने त्याचं इंजिन सुरु केलं. त्यानंतर विक्रम लँडरने 40 सेंटीमीटरची उडी मारली आणि 30-40 सेंटीमीटर अंतर स्वत:हून पार केल्याची माहिती इस्त्रोने दिलीय. हॉप एक्सपेरीमेंटनंतर विक्रम लँडर स्लीप मोडमध्ये गेला आहे. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचं निरीक्षण पाठवलंय.. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाभोवतीच्या मातीचं तापमान प्रोफाइलिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.. चंद्राच्या पृष्ठभागावर तापमान सुमारे 50 अंश सेल्सिअस आहे.. मात्र जसं पृष्ठभागापासून खोलवर जातो तसा तापमानात बदल होतो.. चंद्राच्या पृष्ठभागाच्या 8 सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे 10 अंश सेल्सिअस आहे.


विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 22 सप्टेंबरला पून्हा कार्यन्वित होणार 


विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये गेले आहेत. यांचे सर्व सिस्टीम बंद करण्यात आले आहेत. फक्त  रिसीव्हर ऑन ठेवण्यात आले आहेत.   22 सप्टेंबरला यांना इस्रो मार्फत कमांड देऊन यांना पून्हा कार्यन्वित केले जाणार आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्रावर लँड झाले.