नवी दिल्ली : दोघांच्या भांडणात तिसऱ्याने संधी साधली ही म्हण ऐकली असेल. याचा प्रत्यक्ष अनुभव जंगलात पाहायला मिळाला आहे. चित्ता आणि लकडबग्घाच्या भांडणात हरणाने संधी साधली आहे. हे दोघंही शिकारीसाठी शेवटपर्यंत भांडत राहिले. या दोघांची अवस्था तेलही गेलं तूप ही गेलं हाती धुपाटणं राहिलं अशी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लकडबग्घा धावत येतो तेव्हा त्याला दिसतं की हरणाची शिकार तर चित्त्याने केली आहे. चित्ता लकडबग्घ्याला पाहून पळ काढतो. लकडबग्घा नेहमीच चित्त्याच्या खाण्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांची शिकार पळवण्यासाठी तयार असतात. 


लकडबग्घ्यानं ते पाहिलं आणि तो हरणाच्या दिशेनं पळत सुटला. त्याने चित्त्याला हुसकवून लावलं. चित्ता पुन्हा येऊ नये म्हणून तो पुढे त्याच्या अंगावर धावून गेला. या सगळ्या भांडणात हरणाने मात्र नामी संधी साधली.


हरणाने पटकन उभं राहून पळ काढला. ज्यामुळे त्याचा जीव वाचला. लकडबग्घा आणि चित्त्याच्या भांडणात हरणाने आपला जीव वाचवला. त्याने शक्तीचा नाही तर युक्तीचा उपयोग केला. हरणाने लकडबग्घा आणि चित्ता दोघांनाही मामा बनवलं.