शिवपुरी :  चहाची तलफ जेवढी आनंद देणारी असते तेवढाच आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंददायी असायला हवा असं प्रत्येकाला वाटत असतं. आयुष्यात छोटे छोटे क्षण जगण्यासाठी आणखी काय हवं असतं. ते जगता आले तर त्याचा आनंद अपार असतो. असाच आनंद चहावाल्याने साजरा केला आहे. त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि आनंद साजरा करण्याची पद्धत खूपच अनोखी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या 5 वर्षांच्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवा फोन खरेदी केला. याचा आनंद साजरा करण्यासाठी चक्क चहावाल्याने बॅण्ड-बाजासोबत टांग्यातून मिरवणूक काढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मिरवणुकीत सगळे आनंदाने नाचताना दिसत आहेत. 


सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मिरवणूक कोणाचा लग्नाची किंवा वाढदिवसाची नाही. तर चक्क आपल्या चिमुकलीची इच्छा पूर्ण केली म्हणून आहे. 5 वर्षांच्या मुलीच्या हट्टानंतर स्मार्टफोन घेतला. त्याचा आनंद एवढा झाला की अख्ख्या गावात मिरवणूक काढण्यात आली. 


स्मार्टफोन घेतल्यानंतर या चहावाल्यानं चक्क बॅन्ड, बाजाच्या आणि नाचगाण्याच्या माध्यमातून हे सेलिब्रेशन केलं. आता या चहावाल्याची सर्वत्र होत चर्चा आहे. मुरारी कुशवाहा असं या चहावाल्याचं नाव आहे. त्याने 12,500 रुपयांचा स्मार्टफोन घेतला. यावेळी त्याने आपल्या मुलीला दिलेलं वचनही पूर्ण केलं आहे. या सगळ्याचा आनंद त्याने आपल्या मुलीसोबत साजरा केला. 


मिरवणुकीनंतर मी मित्रांना छोटी पार्टीही दिली. आता EMI वर फोन घेतला आहे. मुलीनं मला सांगितलं की मी खूप दारू पितो तर ते घेणं कमी करा आणि त्या पैशांमधून मला स्मार्टफोन घेऊन द्या. असं मुरारी यांनी सांगितलं. त्यांनी मुलीचा हा हट्ट पूर्ण केला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियो व्हायरल होत आहे. 


चहावाला आपल्या स्मार्टफोनला वाजत गाजत घरी घेऊन आला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील एका चहावाल्याचा भन्नाट किस्सा समोर आला. स्मार्टफोन विकत घेतला तर ती बातमी संपूर्ण शहराला समजेल असं वचन शिवपुरीच्या चहावाल्याने त्याच्या पाच वर्षाच्या मुलीला दिलं होतं.