गाझियाबाद : 21 वं शतकं म्हटलं तरीही अजून हुंड्याची प्रथा काही मागे पडली नाही. आज अनेक भागांमध्ये प्रत्यक्षात पैसे नाही मात्र सोनं किंवा वस्तू रुपी हुंडा घेतला जातो. लग्नात हुंडा मागितला म्हणून वधूच्या कुटुंबीयांनी नवरदेवासह त्याच्या कुटुंबाला चांगली अद्दल घडवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 31 लाख हुंडा मागितला म्हणून वधूच्या कुटुंबीयांनी नव-यासह त्याच्या नातेवाईकांना लग्नमंडपातच मारहाण केली. मुलीकडच्या घरच्यांनी नवऱ्या मुलाला सुमारे 3 लाख रुपये आणि 1 लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी दिली होती. पण एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. 



नवरदेवानं लग्नावेळी नवरी मुलीकडच्या घरच्यांकडे आणखी काही लाखांची मागणी केली. ही रक्कम दिली नाही तर लग्न मोडण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर नवरीच्या चिडलेल्या नातेवाईकांनी लग्नमंडपातच नवरा मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण केली.


उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये ही धक्कादायक गोष्ट घडली आहे. हुंड्यासाठी असूसलेल्या नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांना जन्माची अद्दल घडेल असा चोप नवऱ्यामुलीच्या कुटुंबाने दिला. आजही अनेक भागांमध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे. जो दिला नाही तर लग्न तुटतात. मात्र या नवऱ्यामुलीनं मात्र चांगली अद्दल घडवली आहे.