मध्यरात्रीच्या जवळची वेळ कोणती? चार पर्याय देऊनही युझर्सना बरोबर उत्तर सापडेना; पाहा
Viral Maths Puzzle : सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. परंतु गणिताची कोडीही व्हायरल होतात अनेक जणं यात रस घेतात. सध्या असंच एक कोडं हे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Viral Maths Puzzle : शाळेत असताना आपल्याला अनेकदा गणिताच्या पेपराची भीती वाटली असलेच. गणित सोडवायची भीती मनात अनेकदा येऊन गेली असेलच. सोबतच आपल्याला एक गणित सोडवताना बराच वेळही लागायचा. परंतु गंमत म्हणेज सोशल मीडियावर असे अनेक पझल्स व्हायरल होत असतात. त्यातही अनेक गणिताचे प्रश्न असतात जे आपण अगदी सहज सोडवायचा प्रयत्न करतो आणि अनेकदा आपण यशस्वी प्रयत्न करतो. त्यातून सध्या असंच एक कोडं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी भल्या भल्यांना हे कोडं सोडवता आलेलं नाहीये. परंतु तुम्हीही प्रयत्न सोडू नका.
यावेळी अनेकांना वाटेल की हा तर फारच सोप्पा प्रश्न आहे आणि यात गणित काय आहे? परंतु यात गणित आहे जे तुम्हीही अगदी आरामात सोडवू शकता फक्त तुम्हाला थोडं डोकं चालवावं लागणार आहे. @S.O नावाच्या एका X अकांऊटवरून असंच एक कोडं शेअर करण्यात आलं आहे. अनेक लोकांना हे कोडं सोडवता आलेलं नाही. अनेकांना हे सोप्पं वाटतं आहे. परंतु हे कोडं तितकसं सोप्पं नाही. यावेळी एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात इंग्रजीत विचारण्यात आलं आहे की 'मध्यरात्री होते तेव्हा किती वाजलेले असतात?' (What is the closet time to midnight)
हेही वाचा : वयोवृद्ध मित्रांच्या मैत्रीकडे पाहून व्हाल भावुक; काही क्षणांचा आनंद देणारा सुंदर VIDEO पाहिला का?
या प्रश्नाखाली चार पर्याय देण्यात आले आहेत. 1. 11:55 AM 2. 12:06 AM 3. 11.50 AM 4. 12:03 AM. यातून तुम्हाला या प्रश्नाचे अचूक उत्तर द्यायचे आहे. ही पोस्ट अनेक महिन्यांपुर्वीची आहे. परंतु फारच कमी कालावधीत या पोस्टला 42.9 मिलियनपेक्षाही जास्त व्हूज मिळाले आहेत. तुम्हाला वाटेल की हा प्रश्न तर किती सोप्पा आहे. परंतु त्यातील गणित तुम्हाला माहिती नाही. नाही हा प्रश्न सोप्पा नसता तर इतका व्हायरल झालाच नसता. अनेकांनी कमेंट्स सेक्शनमधून या प्रश्नाचे उत्तर हे 12:03 AM किंवा 11:55 AM असं दिलं आहे.
परंतु सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. त्यामुळे सध्या याची जोरात चर्चाही रंगलेली आहे.