इंदूर :  टिळक नगर पोलिस स्टेशनमध्ये एक चोरीची घटना नोंदवण्यात आली. रेवेन्य नगर येथील एक व्यक्तीच्या मुलीचे लग्न एका हॉटेलमध्ये करण्यात येणार होते. वधूचे वडील आणि इतर नातेवाईक या हॉटेलमधील एका खोलीत देवाची मूर्ती आणि दागिन्यांनी भरलेली बॅग सोडून नवऱ्याची वरात आल्याने त्यांच्या स्वागतासाठी गेले. या वेळी चोराने ही बॅग पळवली. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नव्हते, परंतु बाहेरील कॅमेरामध्ये मात्र तो चोर कैद झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रेवेन्य नगरमध्ये राहणारे संजय ठाकूर यांच्या मुलीचे लग्न टिळक नगर पोलीस स्टेशन परिसरातील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आयोजित केले होते. संजय यांनी एका बॅगेत आपल्या मुलीचे दागिने, देवाची मूर्ती आणि मोबाइल फोन ठेवला होता. नवऱ्याची वरात दारात आल्याने, सर्व नातेवाईक नवऱ्याच्या स्वागतासाठी गेले.


त्यावेळेस वधूच्या वडिलांनी दागिन्यांची बॅग एका बाईला सांभाळण्यासाठी दिली आणि ते स्वत: देखील नवऱ्याचे स्वागत करण्यासाठी निघून गेले.


हॉटेलमध्ये कॅमेरा नाही


नवरदेवाच्या वरातीचे स्वागत करण्यासाठी जाणे वधूच्या वडिलांची सर्वात मोठी ठरली. चोरट्याने त्या बॅगवर लक्ष ठेवून त्या महिलेची नजर चुकवून दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास केली. परंतु हॉटेलच्या बाहेर बसवलेल्या कॅमेऱ्यात चोराला बॅग घेऊन जाताना पाहिले गेले.


सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोराच्या शोधात आहेत. बॅगेमध्ये 3 लाखांहून अधिक किंमतीचे दागिने ठेवले होते.


इतके मोठे हॉटेल असूनही प्रोग्राम हॉलमध्ये एकही कॅमेरा लावला गेला नव्हता. या हॉटेलच्या चुकीमुळे या चोराचा चेहरा स्पष्ट पाहता आला नाही. परंतु आता अस्पष्ट फुटेजच्या आधारे पोलिस चोराचा शोधात गुंतले आहेत.