रांची : तुम्ही लग्नाचे वेगवेगळे किस्से पाहिले किंवा ऐकले असणार. ज्यामध्ये कोणी पळून लग्न केल्याचे किस्से आहेत, तर कोणी फिल्मी पद्धतीने लग्न केले असल्याची कहाणी आहे. पण आम्ही ज्या लग्ना बद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ती प्रेम कहाणी तुम्ही कादाचितच कुठे ऐकली असणार. कारण ही एक वेगळी कहाणी आहे. जी तिथे उपस्थित असणाऱ्या वधू-वरा बरोबरच सगळ्यांच्या लक्षात राहणारी आहे. जी सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली आहे. कारण यामध्ये नवऱ्याने एका लग्न झालेल्या महिलेच्या भांगामध्ये चालत्या ट्रेनमध्ये शौचालयाच्या समोर कूंकू भरुन ट्रेनमधील लोकांच्या साक्षीने लग्न केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनु कुमारी आणि आशु कुमार असे त्या जोडप्यांचे नाव आहे. ही घटना  सुल्तानगंज येथील आहे. अनु कुमारी आणि अशु यांचे प्रेम होते. परंतु अनुच्या घरच्यांनी त्यांना लग्न करायला संमती दिली आणि अनुचे लग्न किरणपुर गावातील एका मुलासोबत करुन दिले. परंतु अनुला या नवीन संसारात काही रस नव्हता कारणा तिने आधीच आशु सोबत संसार थाटायचे स्वप्न पाहिले होते.


अनुचे लग्न झाल्यानंतर ही आशु अनुला भेटायला तिच्या सासरी जायचा आणि तिच्या घराच्या अवतभवतील फिरत बसायचा. त्यानंतर त्या दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनुने तिच्या सासरच्यांना बाजारात जाते असे सांगून ती घरा बाहेर पडली आणि आशुला भेटली. त्यानंतर त्यांनी थेट स्टेशन गाठले. तेथून त्या दोघांनी बँग्लोरला जाणारी ट्रेन पकडी आणि नव्या आयुष्याला सुरवात करण्याचे ठरवले.


सह प्रवाशांनी केलेल्या वक्तव्यानुसार, त्या दोघांमध्ये काही बोलणे झाले. त्यानंतर अनु ने आपल्या भांगेतल असलेले कुंकु पुसले आणि आपल्या गळ्यातील मंगळसुत्र ही काढले.  हे काय घडतयं? हे पाहून आजू बाजूच्या व्यक्तींना आश्चर्य वाटले. त्यानंतर अनुनेच तिच्या बॅगेमधून कूंकवाची डब्बी काढली आणि ते दोघेही ट्रेनच्या शौचालयाजवळ जाऊन उभे राहिले. ट्रेनमधील सगळ्या लोकांच्या साक्षीने आशुने अनुच्या भांगात कुंकु भरले. दोघांनी एकमेकांना आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन दिले आणि त्यांचे लग्न पार पडले.


दोघांनी लग्न केल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यानंतर भीरखुर्द पंचायत समीतेचे मुख्या संजीव कुमार सुमन यांनी सांगितले की, अशा पद्धतीचे कार्य करणे हे निंदनीय आहे. प्रशासनाने अशा गोष्टींवर काहीतरी पाऊल उचलण्याची गरज आहे. कारण या घटना समाजातील दुसऱ्या लोकांना ही, असे पाऊल उचलण्यास प्रेरित करतात जे अगदी चुकीचे आहे.