Vande Matram Express: अरे बिचारा! वंदे मातरम् एक्सप्रेसमध्ये Selfie घेण्याचा मोह त्याला नडला अन् संकटातच सापडला
Selfie Man in Vande Mataram Express: सेल्फी घेण्याची हौस ही सगळ्यांनाच असते. त्यातून काहींना तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी सेल्फी (Selfle) घेण्याची हौस असते. कधी कधी अनेक लोकं या सेल्फीशिवायही राहूच शकतं.
Selfie Man in Vande Mataram Express: सेल्फी घेण्याची हौस ही सगळ्यांनाच असते. त्यातून काहींना तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी सेल्फी (Selfle) घेण्याची हौस असते. कधी कधी अनेक लोकं या सेल्फीशिवायही राहूच शकतं. सध्या अशाच एका इसमाचा व्हिडीओ (Video) होतो आहे ज्यात तो सेल्फी घेण्यासाठी वंदे मातरम् एक्सप्रेसमध्ये (Vande Mataram Express) चढला आणि तिथेच अडकून पडला. या एक्सप्रेसमध्ये दरवाजे हे आपोआप बंद होणारे असल्याने त्याला धड बाहेरही जाता येईना यामुळे तो खूपच अवस्थ झाला. त्याच्या बिचाऱ्या चेहऱ्याकडे पाहून त्याची दया करावी का त्याच्यावर हसावं हेच समजतं नव्हते. तेवढ्यात टीसीला आला आणि त्याला ओरडू लागला परंतु नक्की त्याच्या सोबत काय घडलं याचा व्हिडीओ (Viral Train Video) सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. (viral news a man stucks at vande mataram express train while taking selfie tc caughts him watch full video)
हा इसम वंदे मातरम् ट्रेनमध्ये चढला आणि सेल्फी घेऊ लागला तेवढ्यात एक्सप्रेसचे दरवाजे आपोआपचं बंद झाले आणि हा इसम आतमध्येच अडकला. तेवढ्यात टीसी येईल म्हणून बाहेर जाण्याचा प्रयत्नही करू लागला परंतु त्याला बाहेर जाणं काही शक्य झालं नाही आणि तो आतमध्येच अडकून राहिला. त्यानंतर विना टिकीट या इसमला आतमध्ये पाहून रेल्वे तपासनीस त्याला उलट प्रश्न विचारू लागले. तेवढ्यात त्यानं आपण सेल्फी काढायाला आतमध्ये आलो होतो मला ही ट्रेन आतून कशी दिसते हे पाहायचे होते.
तेवढ्यात त्या टीसीनं अरे तू काय वेडा आहेस का?, बाहेर हो अशी दमदाटीही केली. सध्या प्रकाराचा संपुर्ण व्हिडीओ हा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतो आहे. या व्हिडीओच्या खालीही अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. सेल्फी घेण्याचे वेड सोडून द्या अशाप्रकारच्या काही कमेंट्स येत आहेत. त्यातून त्याची खिल्लीही उडवली जाते आहे तर काही लोकांना त्याची दयाही येते आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेचाही विषय ठरला आहे.
चक्क 200 किलोमीटर दूर...
या सगळ्या प्रकारात ही व्यक्ती संकटाच सापडली. सेल्फी काढायच्या नादात हा माणूस ट्रेनमध्ये अडकून पडला आणि चक्क 200 किलोमीटर घरापासून दूर गेला. याप्रकारामुळे ही व्यक्ती बराच तास म्हणजे चार ते पाच तास, कदाचित त्याहूनही जास्त वेळ ट्रेनमध्ये अडकून पडली. यामुळे टिकटाशिवाय (TC Caught A Man) विनाकारण ही व्यक्ती घरापासून पुष्कळ दूर निघून गेली. अशा या प्रकारामुळे पुन्हा एकदा सेल्फी घेण्याचा मोह असणाऱ्यांना चांगलाच धडा मिळेल.