बिहार : लग्नसोहळा हा एक असा समारंभ आहे ज्यामध्ये दोन लोकंच नाही तर दोन कुटूंब एकत्र येतात. लग्नाची भावना प्रत्येकासाठी खूप खास असते. लग्नाच्या दिवसापासून नवविवाहित जोडप्ये आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करतात. परंतु काही लोकांच्या आयुष्यात अशा काही अप्रिय घटना घडतात की, ज्याचा त्यांनी कधी विचार देखील केलेला नसतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच बिहारमधील पालगंज जिल्ह्यात असेच काहीसे घडले आहे. जिथे एका जोडप्याने आपल्या मर्जीने लव्ह मॅरेज तर केले. परंतु त्यांच्या नंतर असे काही झाले की, त्यांना त्यांच्या हनिमूनच्या रात्री रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली.


वधूचे नाव शांती देवी आहे. शनिवारी तिचे लग्न मुकेश कुमार सिंह याच्याशी झाले. मुकेश कुमार हा गोपाळगंजचा रहिवासी आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. त्यामुळे या दोघांनी एका मंदिरात लग्न केले.


नातेवाईकांनी सांगितले की, विवाहानंतर या दोघांनी रविवारी घरी एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये नातेवाईकांना बोलावले गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर शांती देवी आणि मुकेश कुमार सिंह दोघे ही आपल्या खोलीत झोपायला गेले.


झोपायला गेलेल्या या नवविवाहित जोडप्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी चिकनमध्ये विष मिसळून खाल्ले होते.


त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, लग्नानंतरच्या एका दिवसानंतर या जोडप्याने आपले आयुष्य संपण्यासारखे मोठे पाऊल का उचलले याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.


हे दोघेही नोतेवाईकांना बेशुद्ध अवस्थेत दिसले, त्यामुळे त्यांने लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल केले. या दोघांची प्रकृती अतिशय गंभीर राहिली. गोरखपूरमध्ये नवविवाहित जोडप्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.


याप्रकरणी सध्या पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. हे दोघेही  बेशुद्ध अवस्थेत असल्याने अशा परिस्थितीत त्यांची चौकशी करता येणार नाही. असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या दोघांनी त्यांच सगळ चांगलं सुरू असताना आत्महत्या करण्याचा विचार का केला? या प्रश्नाचे उत्तर तर हे जोडपे शुद्धीत आल्यावरच आपल्याला कळेल.