Fact Check Ayodhya woman Viral News : सोशल मीडिया हे असं क्षेत्र आहे, जिथे असंख्य लोक व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैशांसाठी वापरत असतात. सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ कधीही केव्हा कसाही व्हायरल होऊ शकतो. आपल्या व्हिडीओ जास्त जास्त लोकांनी पाहावा म्हणून व्हिडीओ बनवणारे यावर विशेष लक्ष देतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये महिला 23 वर्षात 24 मुलं असल्याचा दावा केलाय. काय हे प्रकरण याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही वृत्त संस्थेने केला.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतील खुशबू पाठक या महिलेने व्हिडीओमध्ये सांगितलंय की, या 24 मुलांचं वय 2 ते 18 वर्षांच्या दरम्यान आहे. तिच्या 'मुलांमध्ये' अविवाहित आणि जुळ्या दोन्ही मुलांचा समावेश असल्याचा तिने दावा केलाय. या दाव्याने YouTubers आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यात तिला यश आलंय. मात्र, शोध पत्रकारितेच्या माध्यमातून असा खुलासा झालाय. असं सिद्ध झालंय की, महिलेला फक्त दोन मुलं आहेत, शिधापत्रिकेवर फक्त दोनच मुलांची नावं आहेत. 



अशा परिस्थितीत व्हायरल होत असलेला व्हिडिओ पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचं स्पष्ट झालंय. तर या महिलेचे इतर 21 मुलं ही तिने लावलेली रोपटी आहेत. जिला ही महिला मुलं मानते. 


खरं तर, एक्स यूजर्स @Swati_Priya__ यांनी एका पोस्टमध्ये दावा केला होता की, खुशबू पाठक, ही 'आई'चे वेगळे रूप आहे, तिने 24 मुलांचं संगोपन करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. ही कथा कोणा सामान्य आईची नाही तर एका असामान्य स्त्रीची आहे, जी मुलांसाठी निवारा, घर आणि कुटुंब म्हणून उदयास आली आहे. दुसऱ्या युजर्सने म्हटलं होतं की, 24 मुलांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुशबूने या अनाथ आणि सोडून दिलेल्या मुलांना केवळ दत्तकच घेतलं नाही तर त्यांना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणही दिलं. अजून एक यूजर्स म्हणाला की, अतिशय धाडसी काम करणाऱ्या या मातेला विनम्र अभिवादन. आता त्याच पद्धतीने प्रत्येकाला देशासाठी काहीतरी कराला हवं.