Tomato Viral Story: देशात सर्वसाधारण नागरिकांना टोमॅटो परवडेनासे झाले आहेत. टॅमेटोच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तींनी आपल्या आहारातून टॉमेटोला विश्रांती देणे पसंत केले आहे. तर काहीजण खिशाला कात्री लावून, इतर खर्च कमी करुन टॉमेटो खरेदी करत आहेत. टॉमेटोचे दर इतके वाढले आहेत की काहीजणांनी त्याच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर ठेवले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवऱ्याने भाजीत टोमॅटो टाकल्याचा राग मनात धरून बायको घर सोडून गेली तर कुठे शेतातून टोमॅटो लुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्याने झालेल्या गदारोळानंतर सरकारने त्याचा भाव 80 रुपये प्रतिकिलो केला आहे. असे असतानाही लोक अजूनही अधिक स्वस्त टोमॅटो शोधत आहेत.


आजकाल ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यानुसार भारतात टोमॅटोच्या किंमती वाढल्याने एका आईने आपल्या दुबईत राहणाऱ्या मुलीला फोन केला. इथल्या टॉमेटोच्या वाढलेल्या किंमतीबद्दलचे आपले दु:ख तिने लेकीला सांगितले. मुलीला देखील आईची कहाणी ऐकून खूप वाईट वाटले. दरम्यान दुबईतून 10 किलो टॉमेटो पाठव असे आईने लेकीला सांगितले.


मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत भारतात येत आहे. भारतात येण्यापूर्वी मुलीने तिच्या आईला दुबईतून काही हवे आहे की नाही? असे विचारले. प्रत्युत्तरात मवा 10 किलो टोमॅटो पाठव, असे ती म्हणाली. मुलीनेही आईची आज्ञा पाळत 10 किलो टोमॅटो पॅक करून भारतात पाठवले. तिच्या एका बहिणीने ट्विटरवर हा प्रसंग सांगितला. 


दुबईहून 10 किलो टोमॅटो मागवले


तिने ट्विटरवर लिहिले की, 'माझी बहीण तिच्या मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी दुबईहून भारतात येत आहे. तिने आईला दुबईहून काही हवे आहे का? असे विचारले. प्रत्युत्तरात आई म्हणाली 10 किलो टोमॅटो आण. आता माझ्या बहिणीने सुटकेसमध्ये 10 किलो टोमॅटो पाठवले आहेत. 


माझ्या बहिणीने पर्लपेट स्टोरेज जारमध्ये टोमॅटो पॅक केले होते आणि ते सूटकेसमध्ये ठेवले होते, असे तिने ट्विटरवर लिहिले. आम्ही टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. म्हणूनच मी आता टोमॅटोचे लोणचे आणि चटणी असे काहीतरी बनवणार असल्याचे ती म्हणाले.


यूजर्सकडून मजेशीर प्रतिक्रिया 


ही ट्विटर पोस्ट वाचल्यानंतर यूजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटले की, 'या महागाईच्या काळात सर्वोत्कृष्ट कन्येचा पुरस्कार बहुधा त्या दिशेने जात आहे.' तर दुसरी म्हणाली, 'मुलगी तिच्या आईला दुबईला का घेऊन जात नाही आणि भारतात टोमॅटोचे भाव खाली येईपर्यंत तिथे का ठेवत नाही?'