Viral News Today: आपल्या बालिवूड चित्रपटांमध्ये अनेकदा काही नाट्यमय सीननंतर एखादा हरवलेला मुलगा पुन्हा त्याच्या आईला भेटल्याचे दाखवलं गेले आहे. असाच काहीसा प्रकार दिल्ली विमानतळावरही घडला आहे. एखाद्या बॉलिवडू चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) एक मुलगा 17 वर्षांनी त्याच्या आईला भेटला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विमानतळावर झालेल्या भांडणानंतर आई आणि मुलगा एकत्र आले. 17 वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात ब्रिटनला निघालेला या महिलेचा मुलगा बेपत्ता झाला होता. अनेक वर्षे आई मुलाचा शोध घेत होती. मात्र सर्व प्रयत्न करुनही मुलाचा काही पत्ता लागला नाही. नवी दिल्लीत पेशाने समाजसेविका आणि वकील असलेल्या या महिलेने एका भांडणात मध्यस्थी केल्यानंतर 17 वर्षांनी त्यांना एका महिलेचा हरवलेला मुलगा मिळाला. त्यांच्या भेटीनंतर आईला डोळ्यातील आनंदाश्रू आवरता आले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

17 वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात ब्रिटनला जाण्यासाठी निघालेला एक केरळचा तरुण अचानक गायब झाला होता. 17 वर्षांपूर्वी गायब झाल्यानंतर तेव्हापासून तो सापडला नाही. मात्र नवी दिल्लीती विमानतळावर त्याच्याच एका वकिलामुळे तो कुटुंबाशी पुन्हा जोडला गेला आहे. तिरुअनंतपुरममधील नागरूर येथील 37 वर्षीय तरुण 6 जुलै रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या  आपत्कालीन पासपोर्टवर दिल्लीत आल्यानंतर तो आपल्या कुटुंबाला भेटू शकला आहे. 


नेमकं काय घडलं?


10 जुलै रोजी या तरुणाची वकील दीपा जोसेफ या देखील आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर होत्या. विमातळाच्या कॅफेटेरियामध्ये भांडण सुरू असल्याचे दीपा यांनी दिसले. भांडणाऱ्या माणसाचा कर्मचाऱ्यांशी वाद वाढू लागला होता. त्यावेळी दीपा जोसेफ तिथे गेल्या. भांडणाऱ्या व्यक्तीवर कॅफेटेरियामधून जेवण चोरल्याचा आरोप होता. त्यावेळी दीपा यांनी या वादात हस्तक्षेप केला आणि कॅफेटेरियाला जेवणाचे पैसे दिले. त्यानंतर हे भांडण मिटले.


त्यानंतर दीपा जोसेफ या त्या तरुणाला बाजूला घेऊन गेल्या. जेव्हा मला कळले की तो आपत्कालीन पासपोर्टवर भारतात पोहोचला आहे. तेव्हा मी त्याचकडे अधिक चौकशी केली. चौकशीत तो केरळमध्ये असल्याचे कळालं. मात्र तो केरळमधील आपल्या कुटुंबाबाबत स्पष्ट उत्तर देऊ शकला नाही. तो अस्वस्थ दिसत होता. त्याच्याकडे फक्त दोन डॉलर्स आणि सिमकार्ड नसलेला जुना मोबाईल होता. माझे दिवसभराचे वेळापत्रक आधीच ठरलेले असल्याने त्याला मदत करण्यासाठी मी तिथे थांबू शकले नाही. मात्र त्याचा फोटो काढला आणि त्याच्याबाबत थोडी माहिती दिली, असे जोसेफ यांनी सांगितले.


फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर लगेचच संध्याकाळी एका व्यक्तीने दीपा यांच्याशी संपर्क साधला. त्या व्यक्तीने पोस्टमध्ये आणि स्थानिक पोलिसांकडे आपला संपर्क क्रमाक दिला होता. दीपाने त्या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा कळले की त्या व्यक्तीची आई आधीच पोलीस ठाण्यात हजर होती. त्यानंतर पोलीस ठाण्यातील महिलेने दीपा यांच्यासोबत संपर्क साधला. महिलेने सांगितले की फोटोतील व्यक्ती हा माझा मुलगा आहे, जो 17 वर्षांपूर्वी ब्रिटनला गेला होता. त्यानंतर त्याचा कुटुंबाशी संपर्क तुटला होता. दीपा दिल्लीत त्या व्यक्तीला शोधण्यासाठी निघाली. इकडे त्या व्यक्तीची आईही केरळहून दिल्लीला पोहोचली होती. अखेर प्रयत्नांना यश आले आणि दीपा यांनी पुन्हा आई आणि मुलाची भेट घडवून आणली.