Viral News: ज्याप्रमाणे आपल्याला भविष्याची काळजी असते तितकेच आपण आपल्या भूतकाळात रमलेलो असतो. वेळेसोबत गोष्टी बदलत जातात. पण नंतर हे बदल आपण आपल्या भूतकाळाशी जोडून पाहतो तेव्हा मात्र आश्चर्य वाटत राहतं. सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून लोक आपल्या अशा अनेक आठवणी जागवत असतात. मग ते जुने फोटो असो किंवा मग काही कागदपत्रं असतोत. जसजसं आपण पुढे जात असतो तसतसं या गोष्टी एक वेगळाच अनुभव देत असतात. असंच एक जुनं रेस्तराँचं मेन्यू कार्ड (Viral Restaurant Meu Card) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामध्ये लाडू आणि समोसाची किंमत पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या महागाई इतकी वाढली आहे की, आधी इतक्या पैशात काय मिळायचं याची चर्चा नेहमीच रंगलेली असतो. 90 च्या दशकातील तरुणही आज जेव्हा 20 रुपयाचा वडापाव खातात तेव्हा आपण लहान असताना 1 रुपयात मिळायचा अशी चर्चा करताना दिसतात. त्यातच आता 1980 मधील रेस्तराँचं मेन्यू कार्ड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या मेन्यू कार्डमधील दर पाहून तुम्हीही अवाक व्हाल. 


फेसबुकवर हे मेन्यू कार्ड शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये मिठाईचा दर पाहून तुम्हाला विश्वासच बसणार आहे. आज एका समोसासाठी आपल्याला 15 रुपये मोजावे लागतात. पण 1980 मध्ये हा दर फक्त 50 पैसे इतकाच होता. आता तुम्ही म्हणत असाल 50 पैसे कुठे आणि हे 15 रुपये कुठे....इतकंच कशाला आज जितक्या पैशात तुम्ही एक समोसा खात असाल तितक्या म्हणजे 10 ते 15 रुपयात एक किलो लाडू, रसगुल्ले अशी मिठाई मिळत होती. 


या मेन्यू कार्डमध्ये पाहिलंत तर सर्व मिठाई 20 रुपयांपेक्षा कमी किंमतीत किलोच्या दराने उपलब्ध आहेत. समोसा आणि कचोरी तर फक्त 50 पैशात मिळत होते. आज तर 50 पैसे चलनातच नाहीत. 


Gagret Hulchal नावाच्या अकाऊंटवरुन हे मेन्यू कार्ड शेअर करण्यात आलं आहे. 20 फेब्रुवारीला शेअर केलेल्या या मेन्यू कार्डवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मग हे मेन्यू कार्ड पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?