Viral News : लग्न लेकीचं पण आयत्या वेळी बोहल्यावर चढली आई, कारण ऐकून बसेल धक्का
Trending News : लग्न मंडप सजला...लेकीच्या लग्नाने आई आनंदात होती. पण ऐन वेळी लेकीच्या ऐवजी बोहल्यावर आई चढल्याने अनेकांना धक्का बसला..
Trending News : लग्न हा प्रत्येकाचा आयुष्यातील सुंदर आणि अविस्मरणीय क्षण असतो. लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत एक आनंद दडलेला असतो. खरेदीपासून लग्नातील जेवण, कपडे, दागिनी आणि फोटोसेशन, विवाह स्थळ अगदी अनेक गोष्टी...छोट्या छोट्या विधी, परंपरा निभवताना आयुष्यात आपला हक्काचा एक व्यक्ती येणार असतो. अनेक स्वप्न रंगवली जातात...भावी जोडीदाराबद्दलचे अनेक स्वप्न...
लेकीचं लग्न हे आईवडिलांचा भाग्य आणि स्वप्न असतं. लहानचं मोठ केल्यानंतर तिला दुसऱ्या घरी पाठवायचं आणि जबाबदारी पूर्ण करायची अशी आजही मानसिकता आहे. एका आईने आपल्या लेकीचं लग्न ठरवलं. मंडप सजला, नवरी आली आणि नवरदेव हातात हार घेऊन उभा होता पण वेळीवर लेकीऐवजी आईचं बोहल्यावर चढली.
झालं असं की वडिलांनीच पोलिसांनी या लग्नाबद्दल तक्रार केली होती. माझी बायको आमच्या अल्पवयीन मुलंच लग्न लावून देते आहे. त्यामुळे लग्न मंडपात पोलीस पोहोचले. तेव्हा पोलिसांसमोर महिलेने गुगली मारली. माझ्या मुलीचं नाही तर माझं लग्न असल्याचं तिने पोलिसांना म्हटलं. पण पोलिसांना तिचं ही चालाखीचा पत्ता लागला. त्यांनी महिला, तिचा भाऊ आणि महिलेच्या वडिलांना ताब्यात घेतलं. (viral news mother married daughter husband police stopped minor girl marriage trending now)
हेसुद्धा वाचा - Viral Video : नवऱ्याने पत्नीला वकिलासोबत 'त्या' अवस्थेत पाहिलं, नवऱ्याविरोधात तिने कोर्टात...
ही घटना मध्य प्रदेशातील आगर मलवा जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला तिच्या भाऊ आणि वडिलांच्या मदतीने आपल्या अल्पवयीन मुलीचं जबरदस्ती लग्न लावून देत होती. पण महिलेच्या नवऱ्याला हे लग्न मान्य नव्हतं म्हणून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस मंडपात आले हे पाहून महिलेने त्यांना चकवा देण्यासाठी स्वत: नवरीच्या वेशात तयार झाली. मात्र पोलिसांनी तिचं हे खोटं हेरलं आणि धक्कादायक घटना समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. मेहंदी गावात 12 वर्षांच्या मुलीचा बालविवाह करण्यात येत होता. या मुलीचं लग्न तिची आई, आजोबा आणि मामा लावून देत होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हा विवाह थांबवला. त्यांनी नातेवाईकांना हे लग्न का होऊ शकतं नाही हे समजून सांगितलं. पोलिसांमुळे एका लहान मुलीचं आयुष्य खराब होण्यापासून वाचवलं. भारतात लग्नासंबंधी कायदानुसार मुलाचं वय 21 तर मुलीचं वय हे 18 असायला हवं. तर बालविवाह प्रतिबंध कायदानुसार 2006 अन्वये 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचं आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचं लग्न हे बालविवाह असून तो गुन्हा आहे.