दुचाकीच्या धक्क्याने भिकारी कोसळला, खिशातून निघाले साडे तीन लाख रुपये...वाचा काय घडलं
रस्त्यावरुन भिक मागणाऱ्या भिकाऱ्याला दुचाकीने धडक दिली आणि तो खाली कोसळला, यावेळी त्याच्या खिशात लाखो रुपये सापडल्याने पोलिसांसह लोकंही हैराण झाली
Viral News : रस्त्यावरुन चालणाऱ्या एका भिकाऱ्याला (Beggar) दुचाकीने धडक मारली आणि या धडकेत तो खाली कोसळला. अपघात भिकारी गंभीर जखमी झाला. अपघाताची माहित मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या भिकाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जेव्हा त्याच्या सदऱ्याचे खिसे तपाले, तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. त्या भिकाऱ्याच्या खिशातून चक्क साडे तीन लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. पोलिसांनी पैसे पोलीस स्थानकात जमा केले.
काय आहे नेमकी घटना?
ही घटना उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) गोरखपूर (Gorakhpur) इथली आहे. या भिकाऱ्याच्या खिशातून तब्बल 3 लाख 64 हजार रुपये सापडले. इतकी रक्कम पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. या भिकाऱ्याचं नाव शरीफ बऊंक असं असून तो मूकबधिर आहे. त्याचं वय अंदाजे 50 वर्ष इतकं आहे. शरीफ याचं जवळचे नातेवाईक नसून भाचा इनायत अलीबरोबर ते राहतात.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार शरीफ हे भटहट बाजारातील टॅक्सी स्टँडवर भिक मागतात, यातून त्यांना काही पैसे मिळतात. भटहट बाजारात एक तरुण दुचाकीने जात असताना असताना त्याने शरीफ यांना धडकत मारली. यात शरीफ रस्त्यावर कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकी स्वार तरुणाला ताब्यात घेतलं, तर शरीफ यांना रुग्णालयात दाखल केलं.
पोलिसांनी तपासली कागदपत्र
त्या भिकाऱ्याची काही ओळख मिळतेय का हे पाहण्यासाठी पोलिसांनी त्याचा सदरा तपासला. यावेळी त्याच्या सदऱ्याच्या खिशातून तब्बल 3 लाख 64 हजारांची रोख रक्कम निघाली. यात 2 हजारांच्या 168 नोटा, 500 च्या 50 नोटा, 200 च्या 4 नोटा, 100 च्या 14 नोटा, 50 च्या 12 नोटा, 20 च्या 4 नोटा आणि 10 च्या 27 नोटांचा समावेश आहे. भिखारी की उम्र लगभग 50 वर्ष के आस-पास होगी. हादसे से पहले वह शारीरिक रूप से फिट दिख रहा था. ही रक्कम पोलिसांनी जमा केली आहे. शरीफ यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना चांगल्या उपचारासाठी बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
हे ही वाचा : शेवटी ती 'आई' आहे! Uber कार चालवणाऱ्या 'त्या' महिलेचा फोटो का होतोय व्हायरल?
शरीफ यांच्याजवळ सापडलेल्या पैशांवर अद्याप कोणीही दावा केलेला नाही. हे पैसे भाचा इनायतकडे देण्याचं विचारल्यावर शरीफ यांनी हाताने इशारा करत नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम पोलीस स्थानकात जमा केली असून शरीफ रुग्णालयातून बाहेर आल्यावर ही रक्कम त्यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.