नवी दिल्ली: ओव्हर टेक करण्याची सवय जीवावर बेतू शकते हे माहिती असतानाही काहीवेळा मुद्दाम असे प्रकार केले जातात. जास्त स्पीडने कार चालवणं आणि ओव्हरटेक करण्याचा नाद एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. या व्यक्तीला नुसतं महागातच नाही तर खर्चिकही ठरलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटल टनल रोहतांग इथे ओव्हर स्पीडच्या नादात भीषण अपघात झाला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ओव्हर स्पीडमध्ये असलेली कार ओव्हरटेक करण्याच्या नादात दुर्घटना घडली आहे. यामध्ये ड्रायव्हरसह 4 पर्यटक या कारमध्ये होते. 


ही कार ओव्हर टेक करण्याच्या नादात लेनसोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली आणि अटल टनेलमध्ये भिंतीवर आदळली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या कार चालकालाच दंड लावला आहे. 


स्पीडने कार चालवणं आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडीचं नुकसान तर झालंच शिवाय पोलिसांनी 13 हजार 500 रुपये दंड लावला आहे. स्पीडमध्ये ओव्हरटेक करण्याचा नाद भोवला. नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात अपघात टळल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुल्लू गुरदेव शर्मा यांनी दिली आहे.