आजोबांच्या जमान्यातील प्रश्नपत्रिका व्हायरल, 80 वर्षांपूर्वी पाचवीच्या परिक्षेत असायचे इतके कठिण प्रश्न
1943 Year 5th Class Question Paper: आताचं शिक्षण हायटेक झालं आहे. अभ्यास आता ऑनलाईन झाला आहे. अनेक ठिकाणी वह्या-पुस्तकं जाऊन प्रोजेक्टवर अभ्यास शिकवला जातो. अशात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.
1943 Question Paper Viral: काळ बदलत गेला तसं शिक्षणही (Education) बदलत गेलं. खडू आणि पाटीची जागा वह्या-पुस्तकांनी घेतली आणि आता अनेक ठिकाणी वह्या-पुस्तकंही बाद झाली असून प्रोजेक्टरच्या माध्यमातून हायटेक (Hi-Tech) शिक्षण दिलं जातं. काही प्रश्नांची उत्तरं आली नाही तर गुगल (Google) सर्चमध्ये शोधून सेकंदात माहिती मिळते. पण कधी विचार केला आहे का ज्यावेळी इंटरनेट (Internet) नव्हंत त्यावेळी कठिण प्रश्नांची उत्तर कशी शोधली जायची? अशात सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. जवळपास 80 वर्षांपूर्वीची म्हणजे 1943 सालची एक प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालीय.
80 वर्षांपूर्वीची प्रश्नपत्रिका
1943 सालची म्हणजे जवळपास 80 वर्षांपूर्वीची एका शाळेतील सामाहिक परिक्षेचीही प्रश्नपत्रिका आहे (80 year old question paper viral). प्रश्नपत्रिकेवर लिहिल्यानुसार हा कॉमर्स विषयाचा पेपर आहे. यात एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि विद्यार्थ्यांना यापैकी कोणत्याही 8 प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचं बंधन आहे. यासाठी अडीच तासांची वेळ असायची. दहा प्रश्नांसाठी 100 गुणांची ही प्रश्नपत्रिका असून किमान उत्तीर्ण होण्यासाठी 33 गुणांची गरज होती. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचून आताच्या स्कॉलर्सलाही घाम फुटेल.
IAS अधिकाऱ्यांनी केली शेअर
1943 मधली ही प्रश्नपत्रिका निवृत्ती आयएएस अधिकारी बद्री लाल स्वरंकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक कॅप्शनही लिहिला आहे. यात त्याने म्हटलंय 1943-44 सालात पाचवीतल्या मुलांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा दर्जा पाहा. आताच्या पाचवीतल्या मुलांनी यातील एका प्रश्नाचं उत्तर दिलं तरी खूप झालं, असं स्वरंकर यांनी म्हटलंय आहे.
ही प्रश्नपत्रिका पाहून त्यावेळी अभ्यासक्रम किती कठिण असायचा याचा अंदाज येतो. यात व्यवहारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले आहेत. सोन्यापासून कागदाचा भाव किती, कशात मोजला जातो असे प्रश्न यात आहेत. तसंच या प्रश्नांमध्ये काही चिन्हही आहे, त्याचा अर्थ नेमका काय हे कळू शकलेलं नाही. या प्रश्नपत्रिकेतला आठवा प्रश्न आहे रामच्या घरी 2 वर्ष, 3 महिने आणि 18 दिवसात किती पीठ संपतं. या प्रश्नात काही चिन्ह देण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतला दहावा प्रश्न सहज समजण्यासारखा आहे. यात लिहिलंय एक व्यापारिक पत्र लिहा आणि त्यात बाजारभाव मागवा.
युजर्सच्या प्रतिक्रिया
प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सने प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यात आडव्या-उभ्या रेघोट्यांचा अर्थ काय असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर गिरिजेश वशिष्ठ नावाच्या एका युजरने याबाबत माहित दिली आहे. दोन आडव्या रेघांचा अर्थ आहे दोन आणे, दोन अभ्या रेघांचा अर्थ आहे आठ आणे आणि एका रेषेचा अर्थ आहे चार आणे.