Viral Polkhol : पुलावरून पाणी जात असताना पुलावरून जाण्याचं धाडस करू नका असं सांगूनही लोक ऐकत नाहीत. त्यांनीही तेच केलं. पुरात गाडी वाहू नये म्हणून 10 जण गाडीच्या टपावर बसले. आणि पुलावरून गाडी नेली. पण नको ते धाडस त्यांच्या जीवावर बेतले. असं काय घडलं चला पाहुयात.  (viral polkhol car drown bridge water video viral on social media)


नक्की काय घडलं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलावरून पाणी जात होतं. पुराचं रौद्ररूप पाहून पाण्यात उतरण्याचं धाडस कुणालाही होणार नाही. पण यांनी ते धाडस केलं. पुरात गाडी वाहून जाऊ नये म्हणुन काहीजण गाडीत बसले आणि 11 जण टपावर बसले. ड्रायव्हरने गाडी पुराच्या पाण्यात घातली. पाण्याचा वेग पाहता आपली गाडी वाहून जाणार हे माहित असताना ड्रायव्हरने नको ते धाडस केलं. गाडी पुलाच्या मधोमध जाताच गाडी सरकू लागली. 



गाडी सरकतेय म्हटल्यावर गाडीच्या टपावर बसलेल्यांचा थरकाप उडाला. उडी मारून पळावं तर पाणीच पाणी आणि टपावर बसून रागावं तर वाहून जाणार. यांचं दुषित मरण झालं. 


अखेर एकानं उडी मारलीच. पण तो वाहून पुन्हा गाडीजवळ आला. हे पाहून सगळेचण टपावरच बसून राहिले. आणि काही कळायच्या आत गाडी पुलावरून पाण्यात कोसळलीच. सगळेजण वाहून गेले. यात धक्कादायक म्हणजे गाडीत बसलेले दरवाजा न उघडल्याने आतच राहिले.
 
पुलावरील पाणी ओसरेपर्यंत थांबले असते ते ही वेळ आली नसती. पण नको ते धाडस या सगळ्यांच्याच जीवावर बेतले. त्यामुळे हा व्हिडीओ पाहा आणि सावध व्हा.