मुंबई : एका सराईत मोबाईल चोराची. एका चोरट्याने रेल्वे क्रॉसिंग वेळी बाईक स्वाराचा मोबाईल पळवला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. फक्त तीस सेकंदात चोरट्याने हा डाव साधला. (viral polkhol train crossing mobile theft video viral)
 
हा व्हिडिओ पाहा आणि तुम्हीही सावध व्हा. कशी केली या चोरट्याने चोरी चोरी. चला पाहूयात. तुम्ही रेल्वे क्रॉसिंग करत असाल तर तुमचा मोबाईल तुमचे दागिने आणि तुमची बॅग सांभाळून ठेवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण तुमच्याच बाजूला एखादा चोर असू शकतो. या व्हिडिओत बघा या चोरट्याने 30 सेकंदात मोबाईल चोरून पळ काढलाय. आता हा व्हिडिओ नीट पाहा.


रेल्वेचे फाटक पडलं होतं. लोक फाटक उघडण्याची वाट पाहत उभे होते. त्याचवेळी हा चोरटा या लोकांच्या जवळ आला. त्यावेळी एक बाईकस्वार मोबाईलवर बोलण्यात गुंग होता. हीच संधी याने साधली. हा चोरटा बाईकस्वाराच्या बाजूला जाऊन उभा राहतो. आणि ट्रेन येतेय का हे पाहतोय. 


त्याचवेळी ट्रेन येते. ट्रेन जशी जवळ येते त्यावेळी याने याचा मोबाईल खेचला आणि पळ काढला. फक्त 30 सेकंदात मोबाईल लांबवला.



बाईक स्वारांना बाईक सोडली आणि याचा पाठलाग केला. पण ट्रेन येत असल्याने याने चोराचा पाठलाग सोडून दिला आणि चोर या मालगाडीचा फायदा घेत फरार झाला. हा व्हिडिओ व्हायरल होत असून तुम्ही जर रेल्वे क्रॉसिंग करत असाल तर अशा चोरट्यांपासून सावधगिरी बाळगा.