Viral Video Train Seat Cover : सोशल मीडियावरून लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी अनेक नेटकरी काहीही करताना दिसतात. अनेकदा सगळ्याची हद्द पार होईल असं काही तरी ते करतात. असंच काहीसं नुकतचं झालं आहे. एका प्रवाशानं चक्क सार्वजनिक संपत्ती अर्थात रेल्वेचं नुकसान केलं आहे. दरम्यान, ही व्यक्ती कोण आहे त्याविषयी काहीही माहिती समोर आलेली नाही. याशिवाय रेल्वे कडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या आधीच्या ट्विटरवर म्हणजेच आताच्या X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक मुलगा हा सगळ्यांसमोर ट्रेनचं सीट फाडलं. त्या मुलानं जे सीट फाडलंय ते जनरल डब्बा असल्याचं कळत आहे. दरम्यान, ही घटना कोणत्या ट्रेनमध्ये झाली हे स्पष्ट झालेलं नाही. त्याशिवाय हे कोणत्या ठिकाणी झालं ते देखील झालं आहे. त्या मुलानं ट्रेनचं हे सीट फाडून ट्रेनमधून बाहेर फेकून दिलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे याची मागणी केली आहे. त्यासोबत नेटकरी त्या मुलाला ट्रोल देखील करत आहेत. 



रेल्वेतून प्रवास करताना त्याचं नुकसान करण्याची ही पहिली वेळ नाही. नुकताच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यावेळी एका तरुणानं इतर प्रवाशांनी ट्रेनचा दरवाजा उघडला नाही म्हणून चक्क अंत्योदय एक्सप्रेसच्या दरवाज्यावर दगड मारत काच तोडली. ही घटना उत्तर प्रदेशच्या बस्ती रेल्वे स्टेशनवर झाल्याचे म्हटले जाते. त्यासोबत काही लोक हे खिडकीची ग्रिल तोडून डब्ब्यात जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. दरम्यान, या सगळ्याला वाढती लोकसंख्या असल्याचं म्हटलं जातं. 


हेही वाचा : 'या' अभिनेत्याच्या प्रेमात वेडा झाला होता करण जोहर, लग्नानंतरही सोडलं नाही! Video झाला Viral


'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्ट्सनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ट्रेनमध्ये त्याच्या क्षमते पेक्षा जास्त गर्दी असते, तर आत असलेले लोकं बाहेरून येणाऱ्या गर्दीला थांबवून ठेवण्यासाठी ट्रेनचा डब्बा बंद करुन ठेवतात. हे पाहता स्टेशनवर असलेले प्रवासी हे नाराज होतात आणि असं काही करताना दिसतात.