Viral Video: प्रेमात पडल्यावर कोण कधी काय करेल काही सांगता येत नाही. परंतु अती घाई संकटात नेई असं म्हणतात ते काही खोटं नाही तेव्हा जर का प्रेमाच्या भरात आपण जर का असं कोणाला प्रपोज (Purpose Day) केलं तर? हल्ली सोशल मीडियावर (Social Media Viral) अनेक तऱ्हेचे व्हिडीओज व्हायरल होत असतात. त्यातून सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक इसम चक्क आपल्या आईच्या महिलेला प्रपोज करताना दिसतो आहे. त्या महिलेनं मात्र त्याला झापझाप झापला आहे. ती महिला आणि त्याच्या नवऱ्यांनं त्या इसमाला तुडव तुडव तुडवला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच या व्हिडीओचीच (Video) चर्चा आहे. या व्हिडीओमुळे त्या व्यक्तीची मात्र पुरती वाट लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला जर का एखादी व्यक्ती आवडत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करता परंतु ते शेवटी तुमचं प्रपोजल स्विकारणं हे त्या व्यक्तीवर असतं. ती तुमचं प्रपोज स्विकारले अथवा नाही स्विकारणार. तुम्ही त्या व्यक्तीला कसलीच बळजबरी करू शकतं नाही. एकतर्फी प्रेमांमध्ये असं खूप पाहायला मिळतं की, तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम (Love) करता त्या व्यक्तीला तुम्ही प्रपोज करून मोकळे होता परंतु त्या व्यक्तीला तुमच्यासारख्या भावना नसल्यामुळे ती व्यक्ती तुमच्या प्रपोजला हो म्हणू शकत नाही. परंतु अशीच हिम्मत एका इसमानं केलीा आहे आणि त्याला मात्र बदल्यात नकार तर मिळालाच पण त्याचसोबत त्याला अनेक शिव्या आणि मार खावा लागला आहे. 


व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा व्यक्ती एका बाईला प्रपोज करतो आणि त्यानंतर या व्यक्तीला भररस्त्यात ती महिला जोरदार शिव्या देते आणि त्याला वाट्टेल ते बोलते. तो तिची माफी मागायचा प्रयत्न करतो परंतु ती काहीच ऐकण्याच्या मन:स्थिती नसते. ती त्याच्यावर वाट्टेल आरोप करत त्याला मारहाण करायला सुरूवात करते. ही मारहाण इतकी जोरात असते की ती त्याला चक्क चप्पलेनंही मारायला सुरूवात करते. हे पाहून तिच्या आजूबाजूची मंडळीही त्याला बेदम मारहाण करायला सुरूवात करतात. त्या काकूंची तो माफी मागायला जातो तेव्हा कुठे ती महिला शांत होईल असं त्याला वाटतंच असताच पारड फिरतं आणि ती महिला त्याला धू धू धूते. 


झालेला प्रकाराचा हा संपुर्ण व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. पोस्ट खाली नेटकरीही नाना तऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.



अनेक जण व्हॅलन्टाईनच्या (Valentines Day) अंगानं कमेंट्स करताना दिसत आहेत. तर त्याचसोबत काही लोकं ही त्याच्या झालेली फजिती पाहून त्याच्यावर हसताना दिसत आहेत. त्याचपाठोपाठ काहींना त्या बिचाऱ्याची दयाही येते आहे.