Trending Video : सोशल मीडियावर सेकंद सेकंदला व्हिडीओ व्हायरल होतं असतात. त्यातील काहीच व्हिडीओ हे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला. हा व्हिडीओ त्या प्रत्येकासाठी जे कष्टाला घाबरता. कुठलीही गोष्ट करताना कधी वयाचा तर कधी तब्येतीचा तरी कधी अजून कुठली कारणं समोर करतात, ते काम करण्यास मागे फिरतात. अशा प्रत्येकासाठी ही आजीबाई प्रेरणादायी नक्कीच आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ. (viral video 68 old women exercise in gym trending video today google marathi news )


डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज प्रत्येक जण निरोगी राहण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइलवर भर देतो. त्यासाठी खाण्यापिण्यासोबतच ते व्यायामाला महत्त्व देतात. व्यायामासाठी कोणी योगा, डान्स तर कोणी जीम लावतात. व्यायाम आणि तोही जीममध्ये जाऊन, अनेकांना याचा कंटाळाही येतो तर त्या वजनाने हातपाय दुखतात ते वेगळं.


खरं तर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कुठल्याही वयाची बंधन नसतात. मुळातच जोपर्यंत आपण जिंवत आहोत तोपर्यंत आपण तरुण आहोत असं मानायला हवं. या आत्मविश्वासाने आणि जिद्दने आपण कुठलीही गोष्ट आणि कुठलंही कामं कोणत्याही वयात करु शकतो. 


आजीबाईच्या जिद्दीला सलाम! 


जीमला जाण्यासाठी कुठल्याही वयाची मर्यादा नाही. सोशल मीडिया प्लॅटफार्मवरील इन्स्टाग्रामवरील @weightliftermummy या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक आजीबाई एक्साईज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्कं झाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ''आईला तिच्यामध्ये बदल करायचा आहे.''


या आजीचं वय कळलं तर तुम्ही दाता बोट दाबून घ्याल. 68 वर्षांची ही आजी जिममध्ये चेक मोठं मोठं वजन उचलताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण या आजीच्या जिद्दाला सलाम करत आहे. 



ही आजी जिममध्ये बारबेल, डंबेलसोबत व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. गेल्या वर्षी एक महिला साडी नेसून रोज जीममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


हेसुद्धा वाचा - Video : साडी नेसून जेव्हा सासू माँ जिममध्ये आली आणि...


खरं तर जीममध्ये व्यायाम करण्यासाठी वय, कपडे या संकल्पनेला या महिलांनी तडा दिला आहे.