Woman Wearing Saree Working Out In Gym : कोरोना महासंकटानंतर आज प्रत्येक जण आपल्या प्रकृतीबद्दल जागृत झाले आहेत. जिमला (Gym) जाऊन व्यायाम करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. अच्छा जिममध्ये व्यायाम करण्यासाठी टीशर्ट आणि Track Pants घालतात. पण जर अचानक तुमच्या जिमध्ये एखादी महिला (Woman)टिकली आणि साडी नसून आली तर...जिममधील साडी नेसून व्यायाम करणाऱ्या महिलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे.
सध्या सोशल मीडियावर सगळीकडे या महिलेची चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता 56 वर्षीय महिला जिममध्ये साडी नेसून घाम गाळत आहे. साडी नेसूनही ती जड वजन, डंबेल आणि इतर विविध जिम मशीन सहज वापरताना दिसतं आहे.
हेही वाचा - Video : दोन महिला जेव्हा कार पार्क करतात त्यानंतर पुढे जे होतं...
खरंतर ही जिममध्ये एकटी येतं नाही, तर ती आपल्या सूनेसोबत रोज जिममध्ये वर्कआउट (Workout at gym) करायला येतं. ती महिला सांगते की, तिची सून आणि ती नियमित व्यायाम करतात. ती 52 वर्षांची होती तेव्हापासून तिने जिमला जाणं सुरु केलं. या सासूसुना चेन्नईच्या (Chennai) आहेत. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे. (video saasu maa Wearing Saree gym Workout with daughter in law Chennai viral on Instagram social media)
या महिलेसा गुडघ्याचा त्रास होतो. अनेक उपचार केल्यावर तिला व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला. मुलानेही व्यायाम केलं पाहिजे असं सुचवलं. त्यामुळे आज ती आपल्या सुनेसोबत
पॉवरलिफ्टिंग आणि स्क्वॅट्स करते. विशेष म्हणजे त्या महिलेचं दुखणं बरं झालं आहे. या व्हिडीओमध्ये शेवटी महिलेचा सत्कार करण्यात येतो आहे. जे लोक व्यायाम करण्यासाठी बहाणे शोधतात, अशासाठी ही महिला प्रेरणा आहे.