मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडिओ खुपच मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. मात्र हा व्हिडिओ पाहून डोळ्यावर विश्वास देखील बसत नाही. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. 
 
व्हिडिओत काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओत (Viral Video) एक तरूण एका बैलाला बाईकवर डबलसीट घेऊन चाललाय. एका जाडजूड बैलाला बाईकवरून घेऊन जाण खुपच आव्हानात्मक असते. कारण अशाप्रकारे बैलामुळे अपघात होण्याची भितीही असते.मात्र हा तरूण तिला व्यवस्थितपणे बाईकवर घेऊन जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, त्याने बैलाला बाईकवरून कसे नेले असेल. तर तरूणाने बैलाला सीटबेल्ट लावला. हा सीटबेल्ट पुर्णत देसी जूगाड होता. बैल सुद्धा कुठलीही गडबड न करता निवांत बाईकवर बसला आहे. हा व्हिडीओ रस्त्याच्या पलीकडे बाईकच्या पुढे धावणाऱ्या कारच्या खिडकीतून रेकॉर्ड करण्यात आला आहे. 



व्हायरल होत (Viral Video) असलेल्या या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओला आतापर्यंत 6 लाख 40 हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला 21 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. काही युजर्स व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करत आहेत. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.