Viral Video: गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होत असून तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे परिपक्व होत असलेल्या गव्हाची काळजी (Harvesting Wheat) घेण्यासाठी बळीराजा कष्ट घेताला दिसतोय. गव्हाची मळणी यंत्राच्या साह्यानं करावी. मळणी करताना गव्हाचं दाणं फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. मात्र, हे काम करणं सोपी गोष्ट नाही, यासाठी मोठी यंत्रसामग्री वापरणं खूप महाग आहे. ज्याचा खर्च लहान शेतकरी उचलू शकत नाहीत. अशातच एका शेतकऱ्याने भन्नाट जुगाड (Amazing trick) केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या गव्हांची पेरणी वेळेवर झाली आहे, त्यामध्ये साधारणतः 110 ते 120 दिवसांमध्ये गहू पक्व होतो. काही गहूच्या जातीचे दाणे पीक पक्‍व झाल्यानंतर शेतात झडतात किंवा त्याचं नुकसान होतं. गरिब परिस्थितीत देखील काही पौराणिक गोष्टींचा आधार घेऊन काही शेतकऱ्यांनी पारंपारिक परंपरा जपल्या आहेत. नुकसान टाळण्यासाठी पीक पक्‍व होण्याच्या 2 ते 3 दिवस आधी गव्हाची कापणी करावी. त्यासाठी मोठी मॅनपॉवर देखील लागते. मात्र, शेतकऱ्याने अनोखं डोकं (Amazing trick of the farmer while harvesting wheat) लावलं आहे.


अशा परिस्थितीत गरीब होऊनही काही शेतकरी आपल्या मेंदूचा वापर करून कष्टाची कामे सहजपणे सर्जनशील पद्धतीने करताना दिसतात. या दिवसात गव्हाची काढणी करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत देशभरातील शेतकरी यंत्र आणि हाताने शेतात मेहनत करताना दिसत आहेत. दरम्यान, एक शेतकरी असाही आहे जो आपल्या मेंदूचा वापर करून हे काम अगदी सहज करताना दिसतो.


शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड (Amazing trick of the farmer while harvesting wheat) :


सोशल मीडियाच्या (Social Media) अनेक प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक शेतकरी पारंपारिक शेती (Traditional farming) करताना आणि विशेष हातरान मशीनचा वापर करून एकाच फटक्यात गहू काढताना दिसतो. सेकंदात एक रिघ या शेतकऱ्याने पूर्ण केली. त्याचा हा प्रकार पाहून अनेकांचे डोळे उघडेच्या उघडे राहिले आहेत. कष्टाच्या कामात डोक्याचा वापर केल्याने काम अधिक सोपं होतं, हे या व्हिडिओमधून (Trending Video) दिसून येतंय.


पाहा Video -



दरम्यान, काढणी केल्यानंतर पेंढ्या एक ते दोन दिवस उन्हामध्ये वाळवल्या जातात. त्यानंतर मळणी यंत्राने मळणी करावी लागते. त्यानंतर खपली गव्हाची काढणी करतात. गहू कापणी आणि साठवणीचे नियोजन योग्य पद्धतीने झालं की गहु बाजारात नेण्यासाठी तयार असतो.