Video : `हा पुन्हा कधीही स्टेजवर जाणार नाही`; डान्सरसमोर उत्साहात नाचणं पडलं महागात
भावाला या महिलेने डान्स फ्लोअरवर स्वर्गाची भेट घडवून आणलीय
Viral Video : सोशल मीडियाच्या (Social Media) या जगात अनेक व्हिडीओ अल्पावधितच व्हायरल होत असतात. यामध्ये अनेकदा डान्सचेही व्हिडीओ (Dance Video) असतात. अशातच काही महिल्यांच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ राजस्थानमधील (rajasthan) असल्याचे सांगण्यात आलं आहे.
ज़िन्दगी गुलज़ार है या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती राजस्थानी नृत्य (rajasthani dance) करणाऱ्या महिलांसोबत स्टेजवर नाचताना दिसत आहे. या दरम्यान एक महिला त्याला आपल्या त्याला उचलून घेते आणि एवढ्या जोरात गोल फिरवते की तरुणाची प्रकृतीच बिघडते.
या व्हिडिओमध्ये काही लोक राजस्थानी गेट अपमध्ये नाचताना दिसतात. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. त्याचवेळी महिलांचा डान्स स्थानिक लोक बघत असतात. त्यात एका तरुणालाही नाचावसं वाटतं. तो स्वतःला थांबवू शकत नाही आणि थेट स्टेजवर पोहोचतो. यानंतर बेभान होऊन डान्स करायला लागतो. एवढ्यात या तरुणाचं मन भरत नाही. तो त्या महिलांसोबत नाचण्याचा विचार करतो. एका व्यक्तीला त्याचा हेतू जाणवतो आणि तो हातवारे करून दूर जाण्याचा सल्ला देतो. मात्र बेभान झालेला तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो.
मग वेड्या तरुणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी महिला त्याला उचलून घेते आणि गरागरा फिरवते. त्यानंतर थोड्या वेळाने ती महिला थांबते आणि त्या मुलाला उचलण्यासाठी एक व्यक्ती स्टेजवर जाते. कारण त्या तरुणाला स्वतःच्या पायावरही उभे राहता येत नाही.
दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये हा माणूस पुन्हा कधीही स्टेजवर डान्स करणार नाही, असे म्हटले आहे. हा व्हिडिओ जवळपास 65 हजार पेक्षा वेळा पाहिला गेला आहे.