Viral Video : एक चूक अन् बस थेट दरीत; थरकाप उडवणाऱ्या रस्त्यानं प्रवाशांना नेणारा ड्रायव्हर देव नाही तर आणखी कोण?
भारताला विविधतेनं नटलेला देश असं म्हणतात (incredible india). आता या विविधतेची परिभाषा मात्र तितकीच वेगळी हेसुद्धा तितकंच खरं. अशा या देशातील एका सुंदर ठिकाणी पोहोचण्यासाठी अतिशय खडतर प्रवास करावा लागतो
Viral Video News : सुरुवातीलाच एक इशारा, (travelers) प्रवासवेड्यांसाठी हा व्हिडीओ (Video) पर्वणी ठरू शकतो. पण, हलक्या मनाच्या मंडळींनी मन घट्ट करूनच तो पाहावा. कारण व्हिडीमध्ये दिसणारी दृश्य तुमचा थरकाप उडवू शकतात. हे असं नेमकं का म्हटलं जातंय याचा अंदाज तुम्हाला व्हिडीओ पाहून सहजपणे लावता येईल. त्याआधी एक प्रश्न; तुम्हाला प्रवास करायला आवडतो का? आवडत असेल तर उत्तम. कारण तुमच्या विशलिस्टमध्ये असणाऱ्या भारतातीलच एका चित्तथरारक वाटेचा हा व्हिडीओ.
भारताला विविधतेनं नटलेला देश असं म्हणतात (incredible india). आता या विविधतेची परिभाषा मात्र तितकीच वेगळी हेसुद्धा तितकंच खरं. अशा या देशातील एका सुंदर ठिकाणी पोहोचण्यासाठी अतिशय खडतर प्रवास करावा लागतो. त्या ठिकाणापर्यंत बसनं पोहोचता येत असलं तरीही ही वाट क्षणोक्षणी आपल्याला थक्क करताना दिसते.
विश्वास बसत नाहीये? मग हा व्हिडीओ पाहाच. (Watch Video)
श्वास रोखणारा प्रवास...
सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये (Social Media trending news) असणारा हा व्हिडीओ आहे, हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) एका रस्त्याचा. व्हिडीओमध्ये हिमाचल प्रदेश रस्ते परिवहन मंडळाची (HRTC Bus) बस एका चिंचोळ्या वाटेवरून जाताना दिसत आहे. ही वाट इतकी धोकादायक आहे, की चालकाची लहानशी चूक बसमधील प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. कारण, वेग वाढवल्यास किंवा स्टेअरिंग चुकीच्या दिशेला फिरवल्यास बस थेट दरीत कोसळू शकते.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
'ट्रॅव्हलिंग भारत' नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये HRTC ची बस हिमाचलमधील (Chamba to Killar) चंबा ते किल्लरपर्यंतच्या प्रवासाला निघाली आहे. अतिशय दुरून टीपण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये डोंगरकपारींचा रस्ता कापत ही बस हळुहळू पुढे येताना दिसत आहे. तिथे बस पुढे येताना पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोकाही चुकतोय हे नाकारता येत नाही.
पाहा : Railway: या ट्रेनमधून 20 तासांचा प्रवास करणं म्हणजे "खतरों के खिलाडी" सारखा अनुभव, प्रवाशांना...
नेटकरी तर, या बसची स्टेअरिंग ज्याच्या हाती आहे, त्या चालकाला देवच म्हणत आहेत. इतक्या प्रवाशांचं आयुष्य नाही म्हटलं तरी त्याच्याच हातात असल्यामुळं तो देवाहून कमी नाही. हो ना?