मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अचानक कधीकधी असे  काही व्हिडीओ पहायला मिळतात, जे खुप मजेदार असतात. त्याच्यातील एखाद्या वेगळे पणामुळेच हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी कोणाला हसवणारे असतात, तर कधी आश्चर्यकरणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. कारण, या व्हिडीओमध्ये नवरदेवाची रिअॅक्शन पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांना हे माहित आहे की, विवाहसोहळ्यांमध्ये, मजा मस्करी सुरू असते. त्यादरम्यान कधीकधी वर-वधू असे काही कृत्य करतात, जे पाहून लोकांना आश्चर्य वाटेल. असंच काहीसं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.


लग्नाच्या विधी सुरू असतात आणि तिथे उपस्थित लोकं नवरीला टिळा लावण्यासाठी तिच्या डोक्यावरील पदर काढायला जातात. तेव्हा वधू अशी काही रिऍक्शन देते, जे पाहून नवरदेव असा काही संतापतो की, तो त्याच्या डोक्यावरच्या टोपी पासून ते गळ्यातल्या हारपर्यंत सगळं काही काढून फेकतो. नवऱ्याची ही रिऍक्शन तुम्ही पाहाल तर तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


खूप मजेदार व्हिडीओ


व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर खूप मजेदार कमेंट्स शेअर केल्या आहेत. त्यावर एका यूझर ने असे कमेंट केलं की, भाऊ लग्नात असे कोण करतो? हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर official_niranjanm87 नावाच्या अकाउंटने शअर केला आहे. लोकांकडून या व्हिडीओला खूपच पसंत केले जात आहे.