Dog on Auto Driver Lap Viral Video : श्वान हा माणसाचा खरा आणि विश्वासू मित्र म्हणून ओळखला जातो. अनेकांच्या घरात श्वास आपला दिसतो. तो घरातील एक सदस्य असतो. त्याला माणसाप्रमाणेच प्रेम लागतं. त्याने आपल्यावर जीव लावला की तो शेवटपर्यंत त्या घरातील प्रत्येकाची काळजी घेतो. घरातील व्यक्ती आजारी असेल किंवा आई घरातून बाहेरगावी गेली असेल तर हा श्वान अन्नाचं एक कणदेखील खात नाही. वेळ प्रसंगी आपल्या मालकाचा किंवा मालकीणीचा जीव वाचविण्यासाठी ते जीवाची पर्वादेखील करत नाहीत. 


ऑटोचालकाचा हा व्हिडीओ पाहिला का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्वान आणि ऑटोचालकाचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. रस्त्यावरुन जाताना कार किंवा दुचाकीवर अनेक वेळा आपण श्वानाला प्रवास करताना पाहिला आहे. पण या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक ऑटो चालक श्वानाला आपल्या मांडीवर बसून ऑटो चालवताना दिसत आहे. त्या श्वानावर त्या चालकाचं किती प्रेम आहे हे त्याचा वागण्यातून दिसत आहे. तो अगदी त्याचा जवळील रुमालाने श्वानाचा चेहरा पुसतो. (viral video dog sits on auto driver lap man drives rickshaw bengaluru trending video on google now)


ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या या ऑटोमधील हे दृश्यं एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ पाहून नेटकरी एकच वाक्य म्हणत आहेत, खरं प्रेम यांच्याकडून शिकलं पाहिजे. 


हा हृदयस्पर्शी व्हिडीओ @alka_itis इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओला 29 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडतोय.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एका यूजर्सने लिहिलं आहे की, ''ज्या लोकांना वाटतं श्वास पाळणं महाग वाटतं त्यांनी हा व्हिडीओ पाहावा.'' हा व्हिडीओ बंगळुरूच्या रस्त्यावरील आहे.  दरम्यान दुसरीकडे पाळीव कुत्र्यांचा हल्ल्याचा अनेक घटना गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी लिफ्टमध्ये एका महिलेने श्वानाला केलेल्या हाणामारीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला होता. कुत्र्यांचा हल्ल्यात लहान मुलांचा जीव गेल्याचीही घटना आहे.  त्यामुळे अनेक लोकांमध्ये श्वानाबद्दल मनात भीती आहे. पुण्यात एका मालकाने श्वानाला मारहाण केल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. एका प्राणी मित्र संस्थेने त्या श्वानाची सुटका करण्यात आली होती.