रस्त्यावरचं खाताय... तर आरोग्याशी खेळताय, हा किळसवाणा Video एकदा पाहाच
हा व्हिडिओ पाहून किळस तर वाटेलच, पण तुम्हाला संतापही आल्याशिवाय रहाणार नाही
Trending Video : देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही. लोकांना शक्य तितकं स्वच्छ आणि काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जातं. चांगला आणि संतुलित आहार करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरुन आपलं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त रहाण्यास मदत होईल. पण वारंवार आवाहन करुनही अनेकजण रस्त्यावरचे पदार्थ खात असतात. रस्त्यावरचं अन्न स्वादिष्ट वाटत असलं तरी ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक (Harmful to health) असतं.
रस्त्यावरचे पदार्थ (Street Food) बनवताना त्यासाठी कोणत्या वस्तू वापरल्या जातात, त्याचा दर्जा काय असतो, कोणतं तेल वापरलं जातं याबाबत शंका असते. इतकंच काय तर आसपास असलेल्या स्वच्छतेबाबतही (Hygiene) कोणतेही निकष पाळले जात नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media Video) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून किळस तर वाटेलच, पण तुम्हाला संतापही आल्याशिवाय रहाणार नाही.
काय आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत?
व्हायरल होणारा हा व्हिडिओ म्हणजे चक्क लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचा संतापजनक प्रकार आहे. खाद्यपदार्थ विक्रीची ही गाडी आहे. या गाडीवर काहीतरी खाद्यपदार्थ विकले जातात. पण त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लेट चक्क रस्त्यावर खड्ड्यात साचलेल्या घाणेरड्या आणि दुषित पाण्यात धुतल्या जात असल्याचं पाहिला मिळतंय. स्वच्छतेच्याबाबतीत किती हरगर्जीपणा बाळगला जातोय, हे या व्हिडिओवरुन दिसतंय.
हा व्हिडीओ इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर त्याला आतापर्यंत एक लाख 38 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडओ पाहिला आणि शेअर देखील केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
त्यामुळे रस्त्यावरचे पदार्थ खाताना ते स्वादिष्ट्य आहेत की नाही यापेक्षा त्याबाबत किती स्वच्छता बाळगण्यात आली आहे याबवर नक्की लक्ष द्या.