Viral Video: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाची भलतीच मागणी, भर मंडपात सासऱ्याने चपलेने धु धु धुतलं
Wedding Viral Video : बोलहल्यावर चढल्यानंतर नवरदेवाने सासरच्या मंडळीसमोर भलतीच मागणी केली. ही मागणी ऐकताच सासऱ्याने पायातील चप्पल काढून नवरदेवाला भरमंडपात झोडपलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Bride Groom Viral Video: सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. नवरा नवरीचे व्हिडीओ (bride groom video), लग्नातील देवर भाभी डान्स व्हिडीओ (Devar Bhabhi Video), नवरीची मंडपात हटके एन्ट्री किंवा नवरदेवाचा डान्स असे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. लग्नातील हंगामाचेही अनेक घटना समोर आल्या आहेत. कधी जेवणावरुन तर कधी मानपानवरुन राडा होतात. या राडाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण सध्या एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
नवरदेवाची भलतीच मागणी ऐकताच...
या व्हिडीओमध्ये पाहू शकता नवदेवाची चक्क भरमंडपात धुलाई झाली आहे. नवरदेवाला दुसरं तिसरं कोणी नाही तर चक्क नवरीच्या वडिलांनी चपलेने झोडपलं आहे. लग्नात नवरदेवाचा थाटच काही और असतो. पण या नवरीदेवाचं स्वागत चप्पलेने झाली. झालं असं काही की, नवरदेवाने लग्नमंडपात नको तो हट्ट धरला. त्याचा हा हट्ट ऐकून सासऱ्यांना राग अनावर झाला. त्यांनी त्याची चपलेने धु धु धुलाई केली. (viral video father in law beat groom demand dowry at Wedding fights Video social media trending now)
त्या नवरदेवाने हुंड्यात बाईकची मागणी केली. एवढंच नाही तर बाईक दिली नाही तर लग्न मोडून निघून जाईल, अशी थेट धमकी दिली. नवरदेवाची मागणी ऐकून मुलीच्या वडिलांनी हुंडा द्यायला नकार दिला आणि होणाऱ्या जावयाची खरपूस समाचार घेतला. तुम्ही पाहू शकता नंतर नवरदेव माफी मागताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटची नवरदेव वधूसोबत मंडपातून जाताना दिसतं आहे. शिवाय वर वधूचीही माफी मागताना दिसत आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. IPS अधिकारी @ipsvijrk यांनी हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त यूजर्सने पाहिला आहे.
आपल्या देशात हुंडा घेण्यास किंवा देण्यास कायद्याने गुन्हा आहे. पण आजही गावपातळीमध्ये हुंडा घेतला किंवा दिला जातोय. आजही अनेक वडिलांचं मुलीच्या हुंड्यामुळे कंबर मोडली आहे. या व्हिडीओमधील वडिलांच्या कृत्याचं नेटकरी कौतुक करत आहेत. हुंडाला विरोध आहे पण अशाप्रकारे मारहाण करणे योग्य नाही, असही अनेक यूजर्सने म्हटलं आहे.